शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'ऑनलाइन प्रार्थना आणि प्रवचने' यांमधून जपणार सुरक्षित अंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 12:36 IST

रमजानच्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता तसेच सर्वोतोपरी काळजी घेण्यासाठी 'ऑनलाइन प्रार्थना आणि प्रवचने' च्या माध्यमातून सुरक्षितता जपली जाणार आहे. दाउदी बोहरा समाजाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

पुणे : कोरोनामुळे सर्वजण चिंतीत आहेत. सगळ्यांना ही वेळ लवकरात लवकर टळो अशी इच्छा आहे. कोरोनाच्या अरिष्टाने अनेकांचे जीव घेतले आहेत. आता तर पवित्र रमजान महिना सुरू झाला असून त्यावर देखील त्याचे सावट कायम आहे. अशावेळी कुणीही मशिदीत गर्दी करू नये असे आवाहन समाजतील ज्येष्ठ व्यक्तींनी केले आहे. आपल्यामुळे कुणाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता तसेच सर्वोतोपरी काळजी घेण्यासाठी 'ऑनलाइन प्रार्थना आणि प्रवचने' च्या माध्यमातून सुरक्षितता जपली जाणार आहे. दाउदी बोहरा समाजाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. नागरिकांच्या मनात भीती आहे. या सगळ्याचा परिणाम विविध सणावर होत आहे. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. परंतु एकीकडे कोरोनाची भीती लक्षात घेऊन समाजातील बांधवांना घरात राहूनच नमाज अदा करण्यास सांगितले आहे. मशिदीत कुणी जायचे नाही, आता प्रार्थना ऑनलाइन करता येणार असून प्रवचने देखील ऐकता येणार असल्याने नागरिकांना फिजिकल डिस्टन्स ठेवणे सोपे होणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना दाउदी बोहरा समाजाचे प्रवक्ते प्रा. कुरेश घोडनदीवाला म्हणाले, आमच्याकडे सैफी ऍम्ब्युलन्स नावाची संस्था आहे ज्या माध्यमातून नागरिकांना पॅरा मेडिकल सुविधा पोहचविण्यात येतात. समाजाचे धर्मगुरू सैदाना मुफ्फद्दल सैफउद्दीन साहेब यांच्या आदेशानुसार आणि जनाब आबदेअली भाईसाहेब नुरुद्दीन यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती काळजी घेतली जात आहे. 

आता तर कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता ज्या भागात बोहरी समाज आहे त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी समाजतील तरुणांची एक टीम तयार केली आहे. त्याद्वारे कुणाला अन्नधान्य, औषधे पुरवण्यात येतात. यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. टीममधील दोन व्यक्ती सतत समाजातील व्यक्तींच्या संपर्कात असून त्यांना आवश्यक त्या सुविधा पोहचविण्यासाठी तत्पर आहेत. 

शहरात किमान 35 ते 40 हजार बोहरी समाज आहे. या समाजातील 95 टक्के व्यक्ती या उद्योगधंद्यात सहभागी आहेत. रविवार पेठ, कसबा पेठ, कॅम्प, कोरेगाव पार्क, वानवडी, कल्याणीनगर, एनआयबीएम रोड, कोंढवा, उंड्री आणि हडपसर या परिसरात हा समाज विखुरला आहे. मुळात शांतताप्रिय, आणि शिस्तशीर म्हणून ओळख असलेल्या बोहरी समाजातील अनेक तरुणांनी स्वयंस्फूर्तीने कोरोनाच्या कामात मदत करण्यास पुढाकार घेतला आहे. काही करून नियमांचे पालन करणे आणि स्वतः बरोबर इतरांची देखील काळजी घेणं हे तत्व सर्वानी लक्षात ठेवले आहे. - प्रा. कुरेश घोडनदीवाला (बोहरी समाज)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे