डीईएसच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन जर्मनवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST2021-05-07T04:10:48+5:302021-05-07T04:10:48+5:30
लॉकडाउनमुळे शाळा-कॉलेज ऑनलाइन भरत आहेत. त्यामुळे विविध सहली, अभ्यास भेटी आणि ‘स्टुडंट एक्सचेंज’ अशा उपक्रमांना विद्यार्थी मुकत आहेत. त्यावर ...

डीईएसच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन जर्मनवारी
लॉकडाउनमुळे शाळा-कॉलेज ऑनलाइन भरत आहेत. त्यामुळे विविध सहली, अभ्यास भेटी आणि ‘स्टुडंट एक्सचेंज’ अशा उपक्रमांना विद्यार्थी मुकत आहेत. त्यावर उपाय म्हणून फर्ग्युसन महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या कल्पनेतून या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ध्रुवची ‘पेन-फ्रेंड’ असणारी लिया टिन्झ या ‘युनायटेड वर्ल्ड कॉलेज’ दिलीजान (अर्मेनिया) येथे शिकणाऱ्या जर्मन विद्यार्थिनीने प्रेझेंटेशनच्या साहाय्याने जर्मनीतील शहरे, संस्कृती, शिक्षण व्यवस्था, राजकीय घडामोडी, पर्यावरण क्षेत्रातील जागृती आदी विषयांची सविस्तर माहिती करून दिली.
विविध विषयांतील तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांनी शिकत राहिले पाहिजे. त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेतला पाहिजे. हे बीज विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती डॉ. सविता केळकर यांनी दिली. केळकर या गेली २५ वर्षे जर्मनीत विद्यार्थ्यांना एक्सचेंज उपक्रमाअंतर्गत घेऊन जात आहेत.
फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. एन. ए. कुलकर्णी यांनी कोपनहेगन येथील आठवणींना उजाळा दिला. बीएमसीसीच्या प्राचार्य डॉ. सीमा पुरोहित, कल्याणी पराडकर, सुरुची फडके, ज्योती बोधे, डॉ. अमृता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.