धामणीतील पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाईन सुविधा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST2021-06-21T04:08:13+5:302021-06-21T04:08:13+5:30
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील प्रगत असणाऱ्या धामणी गावातील ऐतिहासिक आणि ५० वर्षांपासून असणारे पोस्ट ऑफिस एक आदर्श पोस्ट ऑफिस ...

धामणीतील पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाईन सुविधा सुरू
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील प्रगत असणाऱ्या धामणी गावातील ऐतिहासिक आणि ५० वर्षांपासून असणारे पोस्ट ऑफिस एक आदर्श पोस्ट ऑफिस म्हणून काम करते. ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळे अनेक ग्राहक पोस्टशी आपला व्यवहार करतात. परंतु पोस्ट ऑफिस इंटरनेटअभावी ऑनलाइन होत नव्हते. त्यामुळे ऑनलाइन खाती उघडणे किंवा इतर सेवा देणे कामी अडचणी येत होत्या. ग्रामपंचायतच्या पाठपुराव्यामुळे पोस्ट ऑनलाइन होण्यासाठी मदत झाली आहे. पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आला. या पोस्टच्या सुविधेमुळे नागरिकांना पोस्टच्या ऑनलाइन सुविधा मिळणार आहे. याप्रसंगी सरपंच सागर जाधव, माजी सरपंच अंकुश भूमकर, पोस्टमास्तर सांगडे, ग्रा. पं. सदस्य मिलिंद शेळके, श्रीकांत विधाटे, आनंदा जाधव, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय राजे विधाटे, राहुल जाधव, सतीश पंचरास, पोस्टमन सुधाकर जाधव, खंडू मामा बोत्रे, दिलीप आळेकर, पप्पू देशमुख, दिनेश जाधव, गणपत विधाटे, बाळशीराम जाधव, पोपट विधाटे आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.