शिक्षकांसाठी ऑनलाईन शैक्षणिक सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:28 IST2020-12-11T04:28:06+5:302020-12-11T04:28:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने १५ ते १८ डिसेंबर दरम्यान नॅशनल टीचर्स काँग्रेस ही ...

शिक्षकांसाठी ऑनलाईन शैक्षणिक सत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने १५ ते १८ डिसेंबर दरम्यान नॅशनल टीचर्स काँग्रेस ही ऑनलाईन परिषद होणार आहे. मुख्य न्यायाधीशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ जगदीश गांधी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणचे अध्यक्ष डॉ. के कस्तुरीरंगन आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजीचे संस्थापक डॉ अच्युत समंता यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ आर.एम. चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ. सुहासिनी देसाई, स्कुल ऑफ एज्युकेशनच्या प्रमुख डॉ अर्चना चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
परिषदेचे उदघाटन १५ डिसेंबरला होणार आहे. प्रमुख पाहुण्या मणिपूरच्या राज्यपाल डॉ नजमा हेपतुल्ला, माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री पद्मभूषण डॉ मुरलीमनोहर जोशी, कंसाई जपान इंडिया कल्चर सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.टोमियो मिझोकामी, शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, संगणक तज्ञ डॉ विजय भटकर आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ विश्वनाथ कराड अध्यक्षस्थानी असणार आहेत.