खोडद : सध्या कोरोनाच्या काळात सर्वत्र शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू असावे आणि याच काळात विद्यार्थी संगणक साक्षर व्हावेत यासाठी अक्षर भारती संस्थेच्या वतीने पुढाकार घेऊन हिवरे आणि मांजरवाडी शाळेतील १०० विद्यार्थ्यांना लॅपटॉप चे वाटप करण्यात आले होते.
अक्षरभारती संस्था ही शालेय विद्यार्थ्यांसाठी नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याने आमच्या शाळेतील शिक्षक संजय रणदिवे यांच्या पुढाकाराने हिवरे तर्फे नारायणगाव व मांजरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना लॅपटॉप,वाचनासाठी पुस्तके व वैज्ञानिक खेळाचे साहित्य दिले असल्याने विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.
विद्यार्थ्यांचा कोरोना काळात घरी मोबाईलवर शालेय अभ्यास झूम व गुगल मीट च्या माध्यमातून सुरू होता,यात अक्षर भारती संस्थेने लॅपटॉप उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना अधिक फायदा झाला आहे.शिवाय महिन्यात विद्यार्थ्यांना संगणकाचे बेसिक ज्ञान, वाचनासाठी मनोरंजक पुस्तके या बरोबर वैज्ञानिक खेळाचे साहित्यातून मार्गदर्शन केले गेल्याने कोरोना काळातही शाळेने आनंददायी शिक्षण देण्यावर भर दिला आहे.या कामी अक्षरभारतीचे समन्वयक निलेश म्हस्करे,गणेश वागसकर यांचे सहकार्य मिळाले.
"मांजरवाडी शाळा ही उपक्रमशील शाळा आहे.शाळेतील शिक्षक संजय रणदिवे यांनी कोरोना काळात पाठपुरावा केल्याने संस्थेच्या माध्यमातून लॅपटॉप उपलब्ध करून ऑनलाईन संगणक शिक्षण देऊ शकलो.विद्यार्थी ,पालक शिक्षक सहकार्य मिळाले.तालुक्यात हा प्रयोग राबवलेली ही एकमेव शाळा आहे.विद्यार्थी,पालक आनंदी झाले ही या उपक्रमाची पावती आहे." - निलेश म्हस्करे,समन्वयक, अक्षरभारती
शिष्यवृत्ती निकालात मांजरवाडी शाळा तालुक्यात प्रथम क्रमांकावर आहे. कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्या तरी सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू आहे अशातच मुलांना गरज ओळखून लॅपटॉप उपलब्ध करून दिलेली तालुक्यातील मांजरवाडी शाळा कौतुकास पात्र आहे.मुलांनी संगणकाचे शिक्षण उत्तम प्रकारे घेतल्याने कोरोना काळात तो तालुक्यात प्रभावी उपक्रम ठरला आहे.
या उपक्रमाचे विस्तार अधिकारी अनिता शिंदे,केंद्रप्रमुख गोविंद रसाळ यांनी कौतुक केले.
शाळेतील मुख्याध्यापक यशवंत गवारी,मंदाकिनी शिंदे,संजय रणदिवे,सयाजीराव चिखले,बबन सानप,शंकर सोनवणे,पुष्पलता डोंगरे,कमल वायाळ,उषा मुंढे,आशा पाटील,मीनाक्षी राऊत,धनश्री दाते,पुनाजी पारधी,दत्तात्रय साबळे,माणिक बोऱ्हाडे,गुणवंतराव इंगळे,रोहिणी बांबळे यांनी उत्तम नियोजन केले.
अक्षरभारती संस्थेकडून हिवरे तर्फे नारायणगाव व मांजरवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप करून ऑनलाईन शिक्षण देण्यात आले.