ग्रामपंचायतीसाठी आॅनलाईन अर्ज

By Admin | Updated: July 13, 2015 04:21 IST2015-07-13T04:21:49+5:302015-07-13T04:21:49+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांनी वेबसाइटवर दिलेल्या नामनिर्देशनपत्राचा नमुना भरून त्याचे प्रिंटआऊट घेऊन त्यावर स्वाक्षरी करावी़

Online application for Gram Panchayat | ग्रामपंचायतीसाठी आॅनलाईन अर्ज

ग्रामपंचायतीसाठी आॅनलाईन अर्ज

पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांनी वेबसाइटवर दिलेल्या नामनिर्देशनपत्राचा नमुना भरून त्याचे प्रिंटआऊट घेऊन त्यावर स्वाक्षरी करावी़ अशी स्वाक्षरी केलेली प्रिंटआऊट नामनिर्देशनपत्र म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या वेळेत व विहित पद्धतीने दाखल करावी़ असे भरलेले व सही केलेले नामनिर्देशनपत्र, विहित नमुन्यातील नामनिर्देशनपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल़
वेबसाइटवरील हा अर्ज भरतानाचे टप्पे खालीलप्रमाणे : उमेदवारांची नोंदणी, उमेदवाराने नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी लॉगइन, नामनिर्देशनपत्र भरणे, नामनिर्देशनपत्राचा क्रमांक तयार करणे, परिशिष्टाचे अपलोडिंग, भरलेल्या नामनिर्देशनपत्राची पत्र (पीडीएफ) डाऊनलोड करून प्रिंट काढणे़
संगणकीकृत प्रणालीची ओळख
उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासाठी खालील सांकेतिक स्थळाला भेट द्यावी़
https://panchayatelection.maharashtra.gov.in/
नामनिर्देशनपत्र भरण्याची कार्यपद्धती नामनिर्देशनपत्र भरणाऱ्या उमेदवाराला आपल्या आवडीचा वापरकर्ता नाव (युझर नेम) व पासवर्ड वापरून नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी नोंदणी करता येईल़ हे पान मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत उपलब्ध आहे़
उमेदवाराची नोंदणी करण्यासाठी तेथे दिलेल्या ठिकाणी क्लिक करावे़ त्यानंतर खालील पर्याय दर्शविणारे पुढील स्क्रीन दिसेल़
त्यात नगरपालिका, ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीयांपैकी ग्रामपंचायत हा पर्याय निवडल्यावर पुढील स्क्रीन दिसेल़ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराची नोंदणी करण्यासाठी खालील माहिती भरा़
१) आपले आडनाव, नाव व वडिलांचे/पतीचे नाव इंग्रजीत भरा़ महसूल विभाग, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव निवडा (टंकलेखन करण्याची आवश्यकता नाही) त्या त्या ठिकाणी क्लिक करावे़ प्रभाग (वॉर्ड) क्रमांक, जागा क्रमांक निवडा़ २) योग्य प्रभाग (वॉर्ड) निवडल्याची खात्री करावी़ ३) आपले युझरनेम व पासवर्ड भरावे (आपले युझरनेम व पासवर्ड लक्षात ठेवावे) स्क्रीनवर दाखविण्यात आलेले कॅप्चा अचूक पद्धतीने भराव सबमिट बटणावर क्लिक करा़
माहिती योग्यरीत्या भरली असल्यास information saved successfully  असा संदेश दिसेल़
(या नोंदणीद्वारे एका उमेदवारास एका प्रभागातून (वॉर्ड) चार नामनिर्देशनपत्रे भरता येतील़ एकापेक्षा जास्त प्रभागातून नामनिर्देशनपत्र भरावयाचे असल्यास, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र नोंदणी करावी लागेल.

नामनिर्देशनपत्राची प्रिंट घेण्यासाठी उमेदवाराने डाऊनलोड या बटणावर क्लिक करावे.
उमेदवारास त्यांनी भरलेले नामनिर्देशनपत्र बघता येईल.
नामनिर्देशनपत्राची प्रिंटआउट ए ४ साईजच्या कागदावर काढावी. जर उमेदवाराकडे प्रिंटआउट काढण्याची सोय नसेल, तर उमेदवाराने हेल्प डेस्कचा (मदत कक्ष) उपयोग करावा.
उमेदवाराने या नामनिर्देशनपत्रासोबत इतर आवश्यक परिशिष्ट जोडावे.
नामनिर्देशनपत्रावर स्वाक्षरी करून उमेदवाराने प्रत्यक्षरीत्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विहित तारखेस व विहित नामनिर्देशनपत्र व त्यासोबतचे जोडपत्र दाखल करावे.
याप्रमाणे आपण आपला उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीत सहभागी होऊ शकता़ उमेदवाराने या नामनिर्देशनपत्रासोबत इतर आवश्यक परिशिष्ट जोडावे.
सोमवार दि. १३ जुलैपासून ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे.
उमेदवारास नामनिर्देशनपत्र मराठी किंवा इंग्रजी भाषेत भरण्याची मुभा आहे़ नामनिर्देशनपत्रासाठी माहिती भरल्यानंतर उमेदवारास नोंदणी क्रमांक दिला जाईल़ ज्याची नोंद उमेदवाराने करावी़ कारण त्या नोंदणी क्रमांकाचा उपयोग उमेदवाराला निवडणुकीच्या पुढील टप्प्यात आवश्यक असेल़ नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करावयाचे कागदपत्र अपलोड करण्याची सोय करण्यात आली आहे़
महसूल विभाग, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव, वॉर्ड क्रमांक, जागा क्रमांक व आरक्षण हे आपोआप दिसतील.
आपले आधार क्रमांक भरा (आधार क्रमांक भरणे वैकल्पिक आहे, आधार क्रमांक भरले नसल्यामुळे आपले नामनिर्देशन अवैध होणार नाही.)
आपले आडनाव, नाव व वडिलांचे/पतीचे नाव इंग्रजीत भरा. मराठी अनुवाद आपोआप होईल. परंतु अनुवाद चुकीचे झाले असल्यास आपण त्यात दुरुस्ती करू शकता. त्यासाठी मराठी अनुवादवर क्लिक करा व दाखविलेल्या पर्यायापैकी योग्य अनुवाद निवडा.
येथे राखीव प्रवर्ग, जात, वॉर्ड क्रमांक, वॉर्डाचे नाव, मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक भरा.
जागा महिलांसाठी राखीव असल्याची खात्री करा.
घोषणापत्रात योग्य पर्याय निवडा. कोणताही पर्याय न निवडल्यास नाही हा पर्याय आपोआप निवडला जाईल.
कॅपचा (दर्शविण्यात आलेले आकडे व अक्षर) अचूकरीत्या भरा.
भरलेली माहिती तपासून खात्री करून घ्या.
यानंतर आपले नामनिर्देशन नोंदणी क्रमांक दर्शविण्यात येईल. ज्याची आपण नोंद करून घ्यावी. हा
पत्रासोबत जोडत असलेले परिशिष्ट स्कॅन करून अपलोड करावे.
जर उमेदवारास नामनिर्देशनपत्रासोबत जोडत असलेले परिशिष्ट स्कॅन करून अपलोड करणे शक्य नसेल तर त्यांनी हेल्प डेस्कचा (मदत कक्ष) उपयोग करावा.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने जर नामनिर्देशनपत्रासोबत जोडलेले परिशिष्ट अपलोड केले नसल्यास निवडणूक निर्णय अधिकारी ते परिशिष्ट अपलोड करतील. यासाठी उमेदवाराचे युझरनेम व पासवर्ड निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांकडून घ्यावे.
(प्रतिनिधी)

Web Title: Online application for Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.