शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन प्रवेश परीक्षेद्वारे होणार पदवी, पदव्युत्तरचे प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 20:20 IST

विद्यापीठातील विविध विभाग आणि केंद्रामध्ये ८० हून अधिक पदवी व पदव्युत्तर तर सुमारे ७० पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात.

ठळक मुद्देजून महिन्यात प्रवेशपरीक्षा , विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रक्रिया सुकरपणे पार पडणार शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सर्व अभ्यासक्रमांमध्ये फक्त प्रवेश परीक्षेच्या माध्यमातूनच प्रवेश परीक्षा महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख शहरांमध्येही घेतली जाणार विद्यापीठातील अभ्यासक्रमांना लागु

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रवेश तसेच इतर शैक्षणिक प्रक्रियांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने हा महत्पुर्ण निर्णय घेतला आहे. ही परीक्षा महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख शहरांमध्येही घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रक्रिया सुकरपणे पार पडणार आहे.विद्यापीठातील विविध विभाग आणि केंद्रामध्ये ८० हून अधिक पदवी व पदव्युत्तर तर सुमारे ७० पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात. यातील अनेक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची खुप धावपळ होते. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र अर्ज व शुल्क भरावे लागते. त्यामुळे आर्थिक ताणही पडतो. आता यापुढे सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांचा त्रास कमी होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सर्व अभ्यासक्रमांमध्ये फक्त प्रवेश परीक्षेच्या माध्यमातूनच प्रवेश दिले जाणार आहेत. त्यातील बहुतांश अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी मात्र ऑफलाईन परीक्षा घेतली जाईल. संबंधित विभागांमध्ये होणाऱ्या परीक्षेद्वारे या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिले जातील, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली.विद्यापीठातील पीएचडी आणि एमफिलसाठीची प्रवेश प्रक्रियाही जूनमध्येच घेण्यात येणार आहे. या परीक्षांच्या धर्तीवरच पदवी व पदव्युत्तरची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. ऑनलाईन प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये तसेच देशातील काही प्रमुख महानगरांमध्ये घेतली जाईल. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेचा विस्तार तर होईलच, शिवाय विद्यार्थ्यांनाही त्यांच्या जवळच्या वा सोयीच्या शहरामध्ये परीक्षा देणे शक्य होईल. ऑनलाईन प्रक्रियेमुळे अर्ज दाखल करण्यापासून ते अभ्यासक्रम व वसतिगृहामध्ये प्रवेश मिळण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेचे सुसुत्रीकरण केले जाणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

............

जून महिन्यात प्रवेशपरीक्षा पदवी व पदव्युत्तर प्रवेशाची पहिली नलाईन प्रवेश परिक्षा जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात घेतली जाणार आहे. ही परीक्षा बहुपयार्यी स्वरुपाची असेल. त्यामध्ये दोन विभाग असतील. पहिला विभाग २० गुणांचा असेल. त्यामध्ये तर्क, आकलन व सर्वसाधारण अध्ययन कल याबाबत प्रश्न असतील. तर दुसऱ्या भागामध्ये संबंधित अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी आवश्यक विषयांच्या ज्ञानावर आधारीत प्रश्न असतील. हा भाग ८० गुणांचा असणार आहे.  ऑनलाईन प्रवेश अर्ज, अर्हता निकष, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक, प्रवेश परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम यासंबंधीची सविस्तर माहिती लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.-----------

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठonlineऑनलाइन