‘आयटीआय’ आॅनलाइन प्रवेशाचा खोळंबा

By Admin | Updated: July 5, 2014 06:04 IST2014-07-05T06:04:09+5:302014-07-05T06:04:09+5:30

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांच्या आॅनलाइन प्रवेशाचा खोळंबा झाला आहे.

Online access to 'ITI' online | ‘आयटीआय’ आॅनलाइन प्रवेशाचा खोळंबा

‘आयटीआय’ आॅनलाइन प्रवेशाचा खोळंबा

पुणे : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांच्या आॅनलाइन प्रवेशाचा खोळंबा झाला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अद्याप वेळापत्रक प्रसिद्ध झाले नसून शनिवारपासून सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने मागील वर्षीपासून राज्यातील शासकीय ‘आयटीआय’मधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. राज्यातील सुमारे ९९ हजार जागांवरील प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया आहे. संचालनालयाने मागील आठवड्यात ही प्रक्रिया ५ जुलैपासून सुरू होईल, असे संकेतस्थळावर जाहीर केले. तसेच, प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक ३ जुलै रोजी प्रसिद्ध केले जाईल, असेही त्या वेळी स्पष्ट केले होते. मात्र, ३ तारीख उलटून गेल्यानंतरही अद्याप वेळापत्रक प्रसिद्ध झाले नसल्याने विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थी ‘आयटीआय’ला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. या संदर्भात संचालनालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे अद्याप वेळापत्रक प्रसिद्ध करता आलेले नाही. शनिवारी हे वेळापत्रक प्रसिद्ध होण्याची
शक्यता आहे. मात्र, शनिवारपासूनच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल की नाही, याबाबत
साशंकता आहे. कदाचित ही प्रक्रिया एक-दोन दिवस उशिराने सुरू होईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Online access to 'ITI' online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.