आळेफाटा उपबाजारात कांदाभाव स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:14 IST2021-08-25T04:14:05+5:302021-08-25T04:14:05+5:30
आळेफाटा उपबाजारात गेल्या वीस दिवसांपासून कांद्यास लिलावात मिळणारे भाव हे जवळपास स्थिर राहिले आहेत. पावसाळी वातावरणाने कांदा सडेल या ...

आळेफाटा उपबाजारात कांदाभाव स्थिर
आळेफाटा उपबाजारात गेल्या वीस दिवसांपासून कांद्यास लिलावात मिळणारे भाव हे जवळपास स्थिर राहिले आहेत. पावसाळी वातावरणाने कांदा सडेल या भीतीने शेतकरी आता कांदा विक्रीस आणत असल्याने आवक ही वाढत आहे. मात्र अजूनही भावात वाढ होईल अशी आशा शेतकरीवर्गाला आहे. आज जवळपास १५ हजार २०० कांदागोणी विक्रीस आल्या होत्या, अशी माहिती सचिव रूपेश कवडे व कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी दिली.
मंगळवारच्या लिलावात प्रति दहा किलो मिळालेले भाव याप्रमाणे : एक नंबर कांदा १८० ते २०० रूपये, दोन नंबर कांदा १५० ते १८० रूपये, तीन नंबर कांदा ८० ते १५० रूपये, चार नंबर कांदा ३० ते ८० रूपये.