ओतुर बाजारात कांद्याचे भाव कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST2020-11-28T04:04:21+5:302020-11-28T04:04:21+5:30

ओतूर: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओतूर येथील उपबाजार आवारात गुरुवारी २६ हजार ९२४ कांदा पिशव्यांची आवक झाली. ...

Onion prices plummeted in Ootur market | ओतुर बाजारात कांद्याचे भाव कोसळले

ओतुर बाजारात कांद्याचे भाव कोसळले

ओतूर: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओतूर येथील उपबाजार आवारात गुरुवारी २६ हजार ९२४ कांदा पिशव्यांची आवक झाली. कांद्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. नं १ गोळा कांद्यास १० किलोस प्रतवारीनुसार ३६१ रुपये ते ४११ रुपये भाजारभाव मिळाला. रविवारी याच नं १ गोळा कांद्यास १० किलोस प्रतवारीनुसार ४५० रुपये ते ५५१ रुपये बाजारभाव मिळाला होता. जवळपास १४० रुपयांची घसरण भावात झाली आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली .

गुरुवारी प्रतवारीनुसार१० किलोचे भाव : कांदा नं १ (गोळा) ३६१ ते ४११ रुपये. कांदा नं. २- २८१ ते ३६० रुपये. कांदा नं ३- (गोल्टा ) २०१ ते २८० रुपये. कांदा नं ४(बदला) ५० ते २०० रुपये.

बटाटा बाजार : गुरुवारी फक्त ३७ पिशव्यांची आवक होऊन प्रती १० किलोस प्रतवारीनुसार १००रुपये ते ३३० रुपये बाजारभाव मिळाला. आवक कमी असल्यामुळे थोडे भाव वाढले आहेत अशी माहिती कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.

Web Title: Onion prices plummeted in Ootur market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.