शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

कांद्याच्या दरात मोठी घसरण, अपरिपक्व कांदा बाजारात, आवक वाढल्याने किलोमागे ८ ते १० रुपयांनी दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 03:59 IST

केंद्र शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणामुळे दर पडण्याची भीती व ढगाळ हवामानामुळे पावसाची शक्यता यामुळे धास्तावलेल्या शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कच्चा व अपरिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी आणला.

पुणे : केंद्र शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणामुळे दर पडण्याची भीती व ढगाळ हवामानामुळे पावसाची शक्यता यामुळे धास्तावलेल्या शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कच्चा व अपरिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. शुक्रवारी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे एकाच दिवशी नवीन हळव्या कांद्याची तब्बल २०० ते २२० ट्रक आवक झाली. यामुळे कांद्याचे दर २२० ते २८० रुपये दहा किलोपर्यंत खाली आले. किरकोळ बाजारात कांद्याचे दर किलोमागे ८ ते १० रुपयांनी उतरले.यंदा राज्यात बहुतेक सर्वच भागात परतीच्या पावसाने पिकांचे प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामुळे नवीन हळव्या कांद्याची आवक कमी झाली होती, तर जुन्या कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला. यामुळे पंधरा दिवसांपूर्वीच पुणे बाजार समितीती कांद्याला उच्चांकी म्हणजे ३०० ते ४०० रुपये दहा किलोला दर मिळाले. कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र व पुण्यात इजिप्तचा कांदा आलादेखील. परंतु सामान्य ग्राहकांकडून त्याला फारसा उठाव मिळाला नाही. यामुळे परदेशातून कांदा आयात करूनदेखील दरामध्ये फार फरक पडला नाही.परंतु मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे भविष्यात कांद्याचे दर कोसळण्याची भीती शेतकºयांमध्ये आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस झाल्यास हाताशी आलेले कांद्याचे पिक पुन्हा खराब होईल, या धास्तीमुळे शेतकºयांनी नवीन हळवी कांद्याचा हंगाम सुरू होण्यास १५ ते २० दिवस शिल्लक असताना कच्चाच कांदा बाजारात विक्रीसाठी आणला आहे. यामध्ये प्रामुख्याने संगमनेर विभागातून व श्रीगोंदा परिसरातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली.हंगामातील उच्चांकी आवकगेल्या दोन-अडीच महिन्यांपासून बाजारात कांद्याची आवक कमी होती. त्यात नवीन कांद्याचा नवीन हंगाम सुरू झाला नसल्याने व जुन्या कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर दहा किलोमागे ३०० ते ४०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. यामुळे चांगला दर मिळेल, या अपेक्षेने शेतकºयांनी कच्चा कांदाच मोठ्या प्रमाणात बाजारात आणला आहे. यामुळे शुक्रवारी यंदाच्या हंगामातील कांद्याची उच्चांकी आवक झाली. आवक वाढल्याने व कांदा कच्चा असल्याने दर कमी झाले.- विलास भुजबळ,पुणे मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्षदराच्या अपेक्षेने कोवळा कांदा बाजारातगेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कांद्याला चांगला भाव मिळत आहे. यंदा राज्यात चांगला पाऊस झाल्याने नगर, नाशिक, पुण्यासह बीड जिल्ह्यातदेखील कांद्याची मोठ्या प्रमाणात लावगड करण्यात आली. नगर, बीड भागातील हळवी कांदा लवकर खराब होतो व मोड येतात. त्यामुळे येथील शेतकरी कांदा साठविण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यात कांद्याला सध्या चांगले दर मिळत असल्याने या परिसरातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कोवळा कांदा बाजारात आणला आहे. या कांद्याला वजनदेखील चांगले असते, यामुळे कांद्याची आवक वाढून दर कमी झाले.- सूर्यकांत थोरात, कांदा व्यापारीशुक्रवारी मार्केट यार्डमध्ये नवीन हळव्या कांद्याचे२०० ते २२०ट्रक आणि जुन्या कांद्याचे १५ ते२० ट्रक आवक झाली. आवक वाढल्याने दरामध्येदेखील मोठीघट झाली. सर्वसाधारण कांद्याला२७० ते २८०दर देण्यात आले.तर संगमनेर विभागातील कांद्याला२२० ते २८०श्रींगोदा परिसरातील कांद्याला१५० ते २५०रुपये दहा किलोआणि जुन्या कांद्याला३०० ते ३६०रुपये दहा किलो दर देण्यात आला.

टॅग्स :onionकांदाPuneपुणे