कांदा रोपे धोक्यात
By Admin | Updated: October 12, 2015 01:23 IST2015-10-12T01:23:33+5:302015-10-12T01:23:33+5:30
रविवारी सकाळपासूनच असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. त्यातच सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी

कांदा रोपे धोक्यात
मढ : रविवारी सकाळपासूनच असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. त्यातच सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दिवसभराच्या उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. ढगाच्या गडगडाटासह जोरदार पावसाचे आगमन झाले.
जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील उदापूर, बनकरफाटा, डिंगोरे, कोळवाडी, पिंपळगाव जोगा, वाटखळ, मढ या परिसरातील गावांमध्ये सध्या शेतकरी शेतात कांदारोपे टाकण्याची लगबग चालू आहे. काही शेतकऱ्यांची कांदारोपे टाकून झाली आहेत.
रविवारी संध्याकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे जी कांदारोपे मोड येण्याच्या (उतरण्याच्या, बियातून अंकुर फुटण्याच्या) अवस्थेत आहेत. त्या कांदारोपाचे मोठे नुकसान होणार आहे. संध्या कांद्याचे बी किलोला दोन हजारांपासून ते चार हजारांपर्यंत बाजारभाव चालू आहे. त्यामुळे पावसामुळे कांदारोपाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.