शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याची आळेफाटा बाजारात विक्रमी आवक, १५ वर्षांतील विक्रम मोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 03:10 IST

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात रविवारच्या आठवडे बाजारात कांद्याच्या आवकेने १५ वर्षांतील विक्रम मोडला. जवळपास ६0 हजार कांदा गोणी विक्रीस आल्या होत्या. आवक वाढल्याने कांदा दरात घसरण झाली.

आळेफाटा - जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात रविवारच्या आठवडे बाजारात कांद्याच्या आवकेने १५ वर्षांतील विक्रम मोडला. जवळपास ६0 हजार कांदा गोणी विक्रीस आल्या होत्या. आवक वाढल्याने कांदा दरात घसरण झाली.कांद्याचे चांगले आवकेसाठी आळेफाटा उपबाजार पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथे आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार व रविवार कांदा लिलाव होतात. तालुक्यातील व शिरूर तसेच शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर, अकोले येथीलही कांदा विक्रीस येत असल्याने अगदी वर्षभर आवक येथे टिकून राहते. सहा वर्षांपूर्वी येथे विक्रमी अशी ४७ हजार कांदा गोणी आवक झाली होती. त्यानंतर पुन्हा गेल्या आठवड्यात ४२ हजार कांदा गोणी विक्रीस आल्या होत्या. तर शुक्रवारच्या बाजारात चांगल्या प्रतीच्या काद्यांस प्रतिदहा किलो २८५ असा दर मिळाला.जवळपास साठ हजार कांदा गोणी विक्रीस आल्या होत्या तर दरात घसरण झाली. प्रतवारीप्रमाणे प्रतिदहा १00 ते २३0 असा दर मिळाला असल्याचे सभापती संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक आनंद रासकर व कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी सांगितले.सगळीकडे गोणीच गोणी..शनिवारी रात्रीपासूनच शेतकरी कांदा गोणी विक्रीस आणत होते. यामुळे उपबाजाराचे बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लिलावगृहाबाहेरही कांदा गोणी ठेवल्या होत्या. यामुळे सगळीकडे कांदा गोणीच दिसत होत्या.

टॅग्स :Puneपुणेonionकांदा