कांदा, पालेभाज्या कडाडल्या
By Admin | Updated: June 8, 2015 04:59 IST2015-06-08T04:59:40+5:302015-06-08T04:59:40+5:30
गुलटेकडी मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात गेल्या आठवड्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.

कांदा, पालेभाज्या कडाडल्या
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात गेल्या आठवड्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात मालाची आवक घटल्याने कांदा, लसूण, आलं, काकडी, कारली, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची व शेवग्याच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, सर्वच पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली असल्याची माहिती आडते विलास भुजबळ यांनी दिली.
बाजारात रविवारी १५० ते १६० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. हिमाचल प्रदेश येथून दोन ट्रक मटार, कर्नाटकातून पाच ते सहा ट्रक कोबी, इंदौर येथून चार टेम्पो गाजर, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून चार टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश आणि कर्नाटक येथून दहा ते बारा टेम्पो हिरवी मिरची, तर कर्नाटकमधून चार ते पाच ट्रक तोतापुरी कैरीची आवक झाली आहे.
सातारी आल्याची पाचशे ते साडेपाचशे पोती, फ्लॉवरची दहा ते बारा टेम्पो, टोमॅटोची साडेपाच ते सहा हजार पेटी, कोबीची दहा ते बारा टेम्पो, सिमला मिरचीची सात ते आठ टेम्पो, शेवग्याची दोन ते तीन टेम्पो, भुईमुगाची दोनशे ते अडीचशे पोती, तांबड्या भोपळ्याची दहा ते बारा टेम्पो, गावरान कैरीची दहा ते बारा टेम्पो, चिंचेची पन्नास ते साठ गोणी, कांद्याची शंभर ट्रक, आग्रा, इंदौर आणि नाशिक येथून बटाट्याची पन्नास ट्रक, तर लसणाची साडेतीन ते चार हजार गोणींची आवक झाली. पालेभाज्यांत इंदौर आणि गुजरात येथून कोथिंबीरची प्रत्येकी ४ टेम्पो, स्थानिक कोथिंबीरची सत्तर हजार व मेथीची पन्नास हजार जुडींची आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे दर : कांदा : १८०-२४०, बटाटा : आग्रा ८०-१२०, लसूण ४००-८५०, आले : सातारी : ३४०-४४०, भेंडी : १५०-३००, गवार : गावरान : १५०-२५०, सुरती : १५०-२५०, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १००-१५०, काकडी : १४०-१८०, कारली : हिरवी : ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : ४००-५००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१५०, कोबी : ८०-१००, वांगी : २००-२५०, डिंगरी : १००-१५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली : कळी : २००-२५०, जाड : १२०-१५०, शेवगा : ६००, गाजर : १२०-१४०, वालवर : २५०-३००, बीट : १४०-१६०, कोहळा : १५०-२००, आर्र्वी : २८०-३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : २५०-३००, मटार : परराज्य ७००-७५०, पावटा : ५५०-६००, तांबडा भोपळा : ४०-८०, तोतापुरी कैरी : १६०-१८०, गावरान कैरी ६०-१८०, चिंच : अखंड १३०-१५०, फोडलेली ४००-४५०, सुरण २५०-३००, नारळ : १०००-१२००, मका कणीस : (शेकडा) : २००-३००, (१० किलो) ६०-८०.
पालेभाज्यांचे शेकड्यातील दर पुढीलप्रमाणे : कोथिंबीर स्थानिक १०००-२५००, गुजरात ५००-१०००, मेथी ८००-१४००, शेपू ८००-१०००, कांदापात ५००-१०००, चाकवत ५००-६००, करडई ५००-६००, पुदिना २००-३००, अंबाडी ५००-६००, मुळे ५००-१०००, राजगिरा ४००-५००, चुका ५००-८००, चवळई ५००-६००, पालक ७००-८००.
फुलांचे भावही तेजीतच
अवकाळी पावसाचा फटका फुलांनाही बसला असून, त्याचा परिणाम म्हणजे आवक घटली आहे. त्यामुळे सर्वच फुलांच्या दरामध्ये पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
(प्रतिकिलोचे भाव) : झेंडू ३०-८०, गुलछडी ३०-५०, बिजली १००-१५०, कापरी ३०-६०, सुट्टा कागडा २००-३००, मोगरा १५०-३००, (चार गड्डीचे भाव) आॅस्टर २०-३०, गलांड्या ३-१० (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी १०-२०, ग्लॅडिएटर १०-२०, गुलछडी काडी १०-५०, डच गुलाब (२० नग) ६०-१००, लिलिबंडल (५० काडी) ३-६, अबोली लड (५० काडी) ३०-४०, जर्बेरा ४०-८०, कार्नेशियन १००-१५०.
गावरान हापूस खातोय भाव
रत्नागिरी हापूसची बाजारातील आवक जवळपास संपली असून, कर्नाटक हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे गावरान हापूसची सद्य:स्थितीत बाजारात चलती आहे. मागणी वाढल्याने हापूस आंब्यास प्रतिडझनास २७५ रुपये दर मिळाला. रविवारी गुलटेकडी येथील फळबाजारात १०० ट्रे गावरान हापूसची आवक झाली. मुळशी व हवेली तालुक्यातून ही आवक झाली. आणखी महिनाभर आवक सुरू राहील असे, व्याऱ्यांनी सांगितले. लहान आकाराच्या गावरान आंब्यास डझनास २० रुपये दर मिळत आहे, तर गावरान हापूसला २७५ रुपये दर मिळत आहे.