शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

कांद्याची आवक वाढूनही भावात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 1:32 PM

चाकण बाजारात कांद्याची आवक वाढून भावात वाढ, कांदा भाव १४०० रुपये क्विंटल होता..

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात वाढ झाली. कांद्याला १४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बटाट्याची आवक घटून भावही घटले. बटाट्याला १२०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. भुईमूग शेंगांची आवक वाढून भाव घटले, शेंगांना  ६००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.लसणाची आवक वाढून भावात घट झाली. उन्हाळ्यामुळे लिंबाची मागणी वाढली. लिंबांना ८० ते १०० रुपये किलो भाव मिळाला. तरकारी बाजारात वाटाण्याची आवक घटून भावात घट झाली. वाटाण्याला ७००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. फरशीची आवक वाढून भाव घटले. ८००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. हिरवी मिरचीची आवक घटून भाव स्थिर राहिले. मिरचीला ७००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. मेथी, शेपू व पालकची आवक वाढली, तर मेथी, शेपू व पालकच्या भावात वाढ झाली. राजगुरूनगरला मेथीच्या १ लाख २० हजार, तर कोथिंबिरीच्या १ लाख ५० हजार जुड्यांची आवक झाली. शेलपिंपळगावच्या उपबाजारात मेथीची आवक वाढली, तर कोथिंबिरीची आवक घटली. राजगुरूनगरला १ लाख १५ हजार मेथी जुड्यांची तर ९० हजार कोथिंबीर जुड्यांची आवक झाली. जनावर बाजारात गाय, बैल, म्हशी व शेळ्या-मेंढ्यांच्या विक्रीत वाढ झाली....................चाकण बाजारात कांद्याची आवक वाढून भावात वाढ, कांदा भाव १४०० रुपये क्विंटल,  *बटाटा आवक घटून भावही घटले, भाव १२०० रुपये क्विंटल, *भुईमूग शेंगांची आवक वाढून भाव घटले, भाव ६००० रुपये क्विंटल, *लसूण आवक वाढून भावात घट, *उन्हाळ्यामुळे लिंबाची मागणी वाढली, लिंबू ८० ते १०० रुपये किलो, *तरकारी बाजारात वाटाणा आवक घटून भावात घट, भाव ७००० रुपये क्विंटल, *फरशी ( बीन्स ) ची आवक वाढून भाव घटले, भाव ८००० रुपये क्विंटल, *हिरव्या मिरचीची आवक घटून भाव स्थिर, मिरचीचे भाव ७००० रुपये क्विंटल, *मेथी, शेपू व पालकची आवक वाढली, मेथी, शेपू व पालकच्या भावात वाढ, * राजगुरूनगर बाजारात मेथीच्या १ लाख २० हजार, तर कोथिंबिरीच्या १ लाख ५० हजार जुड्यांची आवक, ४शेलपिंपळगावला मेथी आवक वाढली, तर कोथिंबिरीची आवक घटली, ४ राजगुरूनगरला १ लाख १५ हजार मेथी जुड्यांची आवक, ९० हजार कोथिंबीर जुड्यांची आवक, ४जनावरांच्या बाजारात गाय, बैल, म्हशी व शेळ्या-मेंढ्यांच्या विक्रीत वाढ, म्हशींचे भाव वाढले, ४बाजारात एकूण ३ कोटींची उलाढाल....................

शेतमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे :कांदा - एकूण आवक -१२१० क्विंटल. भाव क्रमांक - १ : १४००  रुपये, भाव क्रमांक - २ : ११००  रुपये,  भाव क्रमांक - ३ : ७०० रुपये.बटाटा - एकूण आवक -५५० क्विंटल. भाव क्रमांक - १ : १२०० रुपये, भाव क्रमांक २ : १००० रुपये, भाव क्रमांक ३ : ८०० रुपये.भुईमूग शेंग - एकूण आवक - १० क्विंटल. भाव क्रमांक - १ : ६००० रुपये, भाव क्रमांक २ : ५००० रुपये, भाव क्रमांक ३ : ४००० रुपये.लसूण - एकूण आवक - ५ क्विंटल. भाव क्रमांक - १ : ६००० रुपये, भाव क्रमांक २ : ५५०० रुपये, भाव क्रमांक ३ : ५००० रुपये.फळभाज्या : आवक डागांमध्ये व प्रती १०० किलोंसाठी भाव :हिरवी मिरची - ३१६ पोती (५००० ते ७००० रु.), टोमॅटो - ६७२ पेट्या (२००० ते ३००० रु.), कोबी  -  २९२ पोती ( ६०० ते १००० रु.) फ्लॉवर  - ३१० पोती ( ४०० ते ८०० रु.), वांगी - ४५२ डाग (१५०० ते २५०० रु.), भेंडी : ३९६ डाग ( १५०० ते २५०० रु.) दोडका -१४७ डाग ( २५०० ते ३५०० रु.), कारली - २६७ डाग ( ३५०० ते ४५०० रु.), दुधीभोपळा - २७२ डाग ( ७५० ते १५०० रु.) ४काकडी - २९४ पोती ( ८०० ते १२०० रु.), फरशी - २४ पोती (६००० ते ८००० रु.), वालवड - २३० पोती (३००० ते ५००० रु.) गवार - २६४ पोती ( २००० ते ३००० रु.), ढोबळी मिरची- ३८४ डाग ( १५०० ते २५०० रु.), चवळी - १९४ पोती ( २५०० ते ३५०० रु.) वाटाणा - ५० पोती ( ५००० ते ७००० रु. ), शेवगा - १४५ डाग (२५०० ते ३५०० रु. ), गाजर - ७२ ( १००० ते २००० रुपये )भाजीपाल्यांची आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा भाव : मेथी - १७५९० जुड्या (१००० ते १५०० रु. ), कोथिंबीर- २७२०० जुड्या (१२०० ते २००० रु.), शेपू - ४९०० जुड्या (८०० ते १२०० रु.), पालक - ७६०० जुड्या  (५०० ते ७०० रु.) ...........जनावरे बाजार विक्रीसाठी आलेल्या ८० जर्शी गायींपैकी ५५ गाईची विक्री झाली. (भाव १५ हजार ते ५० हजार रुपये), २७५ बैलांपैकी १६५ बैलांची विक्री झाली. (भाव १० हजार ते ३० हजार रुपये ), ९५ म्हशींपैकी ६५ म्हशींची विक्री झाली. (भाव २० हजार ते ७० हजार रुपये ), विक्रीसाठी आलेल्या १०५७० शेळ्या-मेंढ्यांपैकी ९८५० शेळ्या-मेंढ्यांची विक्री झाली. त्यांना ( १३०० ते १५ हजार) रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात २ कोटी ३५ लाखांची उलाढाल झाली. .....

टॅग्स :ChakanचाकणonionकांदाFarmerशेतकरी