शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 02:25 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी शेतात साठवण करून ठेवलेला कांदा भिजू नये, म्हणून मिळेल त्या भावात कांदा विक्रीसाठी काढला आहे.

अवसरी  - आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी शेतात साठवण करून ठेवलेला कांदा भिजू नये, म्हणून मिळेल त्या भावात कांदा विक्रीसाठी काढला आहे. अल्पभूधारक शेतकºयांना शासनाने कांदाचाळ बांधण्यासाठी शंभर टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी अल्पभूधारक शेतकरी करीत आहे.घोडनदी व डिंभा उजवा कालवा बारमाही पाण्याने वाहत असल्याने अवसरी, निरगुडसर, पारगाव, देवगाव, लाखणगाव, गावडेवाडी, मेंगडेवाडी, पोंदेवाडी या गावातील शेतकरी वर्षाला नगदी पिके पैसे मिळवून देणारी पिके घेत असतात. वरील गावांमध्ये ऊसलागवड, कांदा, बटाटा, गहू, भाजीपाला मोठ्या प्रमाणात करीत असतात.शेतकरी मार्च महिन्यात कांदा लागवड करतात व हा कांदा मे महिन्यात काढणीसाठी येतो. परंतु मे महिन्यात कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने मोठे शेतकरी कांदा बराकीत ठेवतात. मात्र अल्पभूधारक शेतकºयांकडे कांदाचाळ नाही, असे शेतकरी मिळेल त्या भावात कांदा विकून टाकतात.रिमझिम पाऊस झाल्याने शेतकºयांनी शेतात ठेवलेला कांदा विक्रीसाठी भरण्यास सुरुवात केली आहे. सध्या दहा किलो कांद्याला ७५ ते ८० रुपये दर मिळत आहे. कांदा विकून परवडत नाही. परंतु पावसाने भिजून नुकसान होण्यापेक्षा मिळेल ते पैसे पदरात पाडून घ्यावे, म्हणून शेतातील ठेवलेला कांदा भरताना शेतकरी व्यस्त आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे