चाकण बाजारात कांद्याची आवक वाढली; उद्यापासून रोज होणार लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST2021-02-05T05:10:22+5:302021-02-05T05:10:22+5:30
चाकण उपबाजारामध्ये नवीन कांद्याची ८ हजार पिशव्यांची आवक होऊनही कांद्याला ३ हजार १०० रुपये बाजारभाव मिळाला आहे. सध्या ...

चाकण बाजारात कांद्याची आवक वाढली; उद्यापासून रोज होणार लिलाव
चाकण उपबाजारामध्ये नवीन कांद्याची ८ हजार पिशव्यांची आवक होऊनही कांद्याला ३ हजार १०० रुपये बाजारभाव मिळाला आहे. सध्या कांद्याचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात कांदा व बटाटा येत असतो. यासाठी सोमवारची साप्ताहिक सुट्टी सोडून मार्केट यार्डमध्ये दैनंदिन कांदा-बटाटा खरेदी विक्री सुरू करण्याची मागणी चाकण मार्केट यार्ड सब आडते असोसिएशनने बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांच्याकडे केली होती.
कांद्याची वाढती आवक लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे कांदा-बटाटाच्या हंगाम सुरू असेपर्र्नंत दैनंदिन खरेदी विक्री सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. मोहिते पाटील त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाची दैनंदिन खरेदी विक्री मार्केट सुरू करण्यास परवानगी दिल्याने उद्यापासून (दि. २८) रोजच्या रोज कांदा व बटाटा मालाची विक्री लिलाव होणार असून,शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी चाकण बाजारात घेऊन यावा, अशी मागणी सभापती विनायक घुमटकर,उपसभापती धारु गवारी,संचालक बाळ ठाकूर,चंद्रकांत इंगवले,नवनाथ होले यांनी केली आहे.
चाकण बाजारातील वाढलेली कांद्याची आवक.