शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

बाजारात कांद्याची आवक वाढून भाव स्थिर, बटाट्याची आवक वाढून भावात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 17:55 IST

चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ४२०० क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव ९०० रुपये झाला .

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांद्याची आवक वाढून भाव स्थिर राहिले. बाजारात कांद्याची एकूण आवक ४२०० क्विंटल झाली. कांद्याची आवक ७०० क्विंटलने वाढून भाव ९०० रुपयांवर स्थिर राहिले. बटाट्याची आवक वाढून भाव घटल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली. 

चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ४२०० क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव ९०० रुपये झाला . तळेगाव बटाट्याची एकूण आवक १४०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५३० क्विंटलने वाढली, बटाट्याचा कमाल भाव ३०० रुपयाने घटून १४०० रुपये झाला . याही सप्तहात भूईमुग शेंगाची आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक १० क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव ३ हजार रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ३९० पोती झाली.

राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची ९५ हजार जुड्यांची आवक होऊन २०० ते १३०० रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर २ लाख ७० हजार जुड्यांची आवक होऊन ५०० ते १८०० रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.शेपू आवक २२००० हजार जुड्या झाली. ४०० ते १००० असा जुड्यांना भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे :–कांदा - एकूण आवक - ४२०० क्विंटल. भाव क्रमांक १ : ९०० रुपये, भाव क्रमांक : ७५० रुपये,  भाव क्रमांक ३ : ६०० रुपये.बटाटा - एकूण आवक - १७३० क्विंटल. भाव क्रमांक १ : १४०० रुपये, भाव क्रमांक २ : १२०० रुपये, भाव क्रमांक ३ : १००० रुपये.लसूण - एकूण आवक - १० क्विंटल. भाव क्रमांक १ : ३००० रुपये, भाव क्रमांक २ : २५०० रुपये, भाव क्रमांक ३ : २००० रुपये.

फळभाज्या :--------------चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १०० किलोंसाठी डागाना मिळालेले भाव पुढील प्रमाणे :-टोमॅटो - १०२२ पेट्या ( ३०० ते ६०० रू. ), कोबी - २९० पोती ( ३०० ते ६०० रू. ), फ्लॉवर - ३४० पोती ( ४०० ते ७०० रु.),वांगी - ३६० - पोती ( ८०० ते १६०० रु.), भेंडी - ४७० पोती ( २००० ते ३००० रु.), दोडका - २१० पोती ( २००० ते ३००० रु.),कारली - २४० डाग ( २००० ते ३००० रु.),  दुधीभोपळा - २४५ पोती ( ८०० ते १६०० रु.), काकडी - २४८ पोती ( १००० ते २००० रु.),फरशी - ७० पोती ( ४००० ते ६००० रु.), वालवड - २२५ पोती ( २००० ते ३००० रु.), गवार - १९५ पोती ( २००० ते ३००० रू.),ढोबळी मिरची - ४५० डाग ( १००० ते २००० रु.), चवळी - ४५ पोती ( २५०० ते ३५०० रुपये ), शेवगा - १७५ डाग ( २००० ते ३००० रु. ) रुपये . गाजर -९० डाग ( ८०० ते १४०० ) रुपये. 

पालेभाज्या :–—————चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे : -मेथी - एकूण २२८०५ जुड्या ( ४०० ते ८०० रुपये ), कोथिंबीर - एकूण २१२१० जुड्या ( ५०० ते १००० रुपये ),शेपू - एकुण ६४९० जुड्या ( ४०० ते ८०० रुपये ), पालक - एकूण ५४८५ जुड्या ( ३०० ते ५०० रुपये ).

जनावरे :------------चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ५० जर्शी गायींपैकी ३५ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ४०,००० रुपये ),१५० बैलांपैकी १२५ बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते ३५,००० रुपये ), ७० म्हशींपैकी ६० म्हशींची विक्री झाली. ( २५,००० ते ५०,००० रुपये ),शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ९८५० शेळ्या - मेंढ्यापैकी ९६४० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना (१२०० ते १०,००० ) रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात २ कोटी उलाढाल झाली. 

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा