कांदा, बटाट्याच्या भावात घसरण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:55+5:302021-02-05T05:11:55+5:30

ओतूर : ओतूर येथे गुरुवारी बाजारच्या निमित्ताने जुना व नवीन एकूण ७ हजार ७३७ कांदा पिशव्यांची आवक होऊन ...

Onion and potato prices continue to fall | कांदा, बटाट्याच्या भावात घसरण सुरूच

कांदा, बटाट्याच्या भावात घसरण सुरूच

ओतूर : ओतूर येथे गुरुवारी बाजारच्या निमित्ताने जुना व नवीन एकूण ७ हजार ७३७ कांदा पिशव्यांची आवक होऊन भावातही घसरण होत आहे. नवीन कांदा नं. १ (गोळा) प्रतवारीनुसार १० किलोस २६० ते ३०० रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.

गुरुवारी नवीन कांदा प्रतवारीनुसार १० किलोस मिळालेले बाजारभाव खालीलप्रमाणे : कांदा नं. १ (गोळा) २६० ते ३०० रुपये. कांदा नं. २ : १८० ते २६० रुपये, कांदा नं ३ (गोल्टा) १२० ते १८० रुपये, कांदा नं ४ (बदला ४० ते १२० रुपये)

जुना कांदा १० किलोचे बाजारभाव प्रतवारीनुसार ५० ते २६० रुपये.

बटाटा बाजारभाव : बाजारच्या निमित्ताने गुरुवारी १२९ बटाटा पिशव्यांची आवक होऊन १० किलोस ५० रुपये ते १४० रुपये, असा भाव मिळाला, अशी माहिती ओतूर मार्केटचे कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.

Web Title: Onion and potato prices continue to fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.