स्लिपच्या बहाण्याने एकाची फसवणूक
By Admin | Updated: February 11, 2017 02:24 IST2017-02-11T02:24:28+5:302017-02-11T02:24:28+5:30
बँकेत स्लिप भरण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड घेऊन एकाची १२ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना वाकड येथे गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली

स्लिपच्या बहाण्याने एकाची फसवणूक
पिंपरी : बँकेत स्लिप भरण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड घेऊन एकाची १२ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना वाकड येथे गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी इमाम शेख (वय ४०, रा. संदीपनगर, थेरगाव) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैसे भरण्यासाठी शेख वाकड येथील एका बँकेत आले. त्या वेळी दोन इसम त्यांच्या जवळ आले. त्यापैकी एकाने १ लाख ६० हजार रुपये तत्काळ गावी पाठवायचे आहेत. माझे बँकेत बचत खाते नाही, आपण मदत करा, अशी बतावणी केली. आरोपींनी गोड बोलून शेख यांचा विश्वास संपादन करून त्यांचे एटीएम कार्ड घेतले. मोबाईल, एटीएम कार्ड घेऊन निघून गेले. त्यांच्या एटीएममधून १२ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. वाकडचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. धुमाळ तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)