खूनप्रकरणी एकाला 1क् वर्षे सक्तमजुरी

By Admin | Updated: June 19, 2014 23:54 IST2014-06-19T23:54:07+5:302014-06-19T23:54:07+5:30

चाकूने छातीत, पोटात भोकसून खून केल्याप्रकरणी एकाला 1क् वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणो यांनी सुनावली.

One year of murder for murder | खूनप्रकरणी एकाला 1क् वर्षे सक्तमजुरी

खूनप्रकरणी एकाला 1क् वर्षे सक्तमजुरी

>पुणो : तिरुपती बालाजी येथील यात्रेचा खर्च मागितल्याने घरात बोलावून चाकूने छातीत, पोटात भोकसून खून केल्याप्रकरणी एकाला 1क् वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणो यांनी सुनावली. आकाश विजय कोंडय़ा (वय 22, रा. तिरुपती पार्क, टिंगरेनगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सुनील बालन नायर (वय 42, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे.  रजित राजन नायर (वय 32, रा. बोपखेल) असे खून झालेल्याचे नाव आहे.
7 जुलै 2क्13 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास कोंडय़ा याच्या घरात ही घटना घडली. रजित, कोंडय़ा मित्रंसह तिरुपती बालाजी येथे गेले होते, त्या वेळी यात्रेच्या येण्या-जाण्याचा खर्च रजित याने केला होता. त्यामुळे कोंडय़ावर झालेला खर्च रजित मागत होता. हा खर्च कोंडय़ा देत नव्हता. तरीही रजित कोंडय़ाकडून याबाबतची खर्चाची मागणी वारंवार करीत होता. या रागातून कोंडय़ा याने खर्च देतो म्हणून रजित याला घरी बोलावले. तेथे त्याच्यावर चाकूने पाठीवर छातीवर वार केले. त्यात रजित याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी विश्रंतवाडी पोलिसांनी कोंडय़ा याच्यावर खुनाचा गुन्हा  दाखल केला होता. न्यायालयाने कोंडय़ा याला सदोष मनुष्यवधानुसार दोषी धरले व 1क् वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद केले आहे. याप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील संजीव कदम यांनी 8 साक्षीदार तपासले, तर फिर्यादीच्या वतीने अॅड. बी. ए. अलूर यांनी काम पाहिले.  (प्रतिनिधी)

Web Title: One year of murder for murder