एकास ३ वर्षे सक्तमजुरी

By Admin | Updated: February 10, 2016 03:18 IST2016-02-10T03:18:37+5:302016-02-10T03:18:37+5:30

शासकीय कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी कळंब येथील एकास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एम. पोतदार यांनी ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

One year | एकास ३ वर्षे सक्तमजुरी

एकास ३ वर्षे सक्तमजुरी

बारामती : शासकीय कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी कळंब येथील एकास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एम. पोतदार यांनी ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
दत्तू नाना पवार (वय ३९, रा. कळंब, लालपुरी, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. १९ मे २००९ रोजी शेती महामंडळाच्या लालपुरी येथील कार्यालयात आरोपी पवार यांयाने जवळच पडलेली वीट कांबळे यांच्या डोक्यात मारली. त्यामध्ये त्यांना गंभीर इजा झाली. या वेळी आॅफिसचे सहकारी मौला रसूल सय्यद यांनी त्यांना वालचंदनगर येथील लालचंद हिराचंद रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कांबळे यांनी पवार याच्या विरोधात फिर्याद दिली.
सहायक पोलीस निरीक्षक पी. बी. जाधव यांनी या प्रकरणी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात पाठविले होते. (प्रतिनिधी)

Web Title: One year