अश्लील फोटो मित्रांना पाठविल्याचा संशयावरून एकावर कोयत्याने वार; महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:09 IST2021-07-21T04:09:43+5:302021-07-21T04:09:43+5:30

पुणे: अश्लील फोटो मित्रांना पाठविल्याचा संशयाने एकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी महिलेला लोणी काळभोर पोलिसांनी अटक ...

One was stabbed on suspicion of sending pornographic photos to friends; Woman arrested | अश्लील फोटो मित्रांना पाठविल्याचा संशयावरून एकावर कोयत्याने वार; महिलेला अटक

अश्लील फोटो मित्रांना पाठविल्याचा संशयावरून एकावर कोयत्याने वार; महिलेला अटक

पुणे: अश्लील फोटो मित्रांना पाठविल्याचा संशयाने एकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी महिलेला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिला २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी महिलेला (रा.उरूळी कांचन ) अटक केली आहे. तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २४ वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. ही घटना ४ जानेवारी रोजी रात्री 9.30 च्यासुमारास हडपसर आणि लोणी काळभोर गावच्या हद्दीत घडली.

आरोपी महिलेला तिचे अश्लील फोटो फिर्यादीने तिच्या मित्रांना पाठवल्याच्या संशय होता. त्यामुळे आरोपी महिलेसह तिच्या तीन साथीदारांनी फिर्यादींना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केली असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित महिलेला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील हत्यार जप्त करण्यासाठी, त्यांचे आणखी कोणी साथीदार होते का? गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करण्यासाठी, गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यासाठी तिला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली.

-----------------------------------------------------

Web Title: One was stabbed on suspicion of sending pornographic photos to friends; Woman arrested