पैशाची मागणी केल्याप्रकरणी एकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:09 IST2021-07-10T04:09:09+5:302021-07-10T04:09:09+5:30

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर मधुकर हिंगे (रा. अवसरी बुद्रुक) हे सायंकाळी ८ वाजता अवसरी बुद्रुक गावच्या हद्दीत ...

One was beaten for demanding money | पैशाची मागणी केल्याप्रकरणी एकाला मारहाण

पैशाची मागणी केल्याप्रकरणी एकाला मारहाण

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर मधुकर हिंगे (रा. अवसरी बुद्रुक) हे सायंकाळी ८ वाजता अवसरी बुद्रुक गावच्या हद्दीत एसटी स्टॅंडवर उभे होते. त्यावेळी त्यांच्या मामाची मुले रोहित मल्हारी भोर, ओमकार मल्हारी भोर आणि त्यांचा मित्र प्रणव भोर येथे आले. रोहित भोर याने फायटरने सागर मधुकर हिंगे यांच्या उजव्या डोळ्यावर व नाकावर मारून जखमी केले. हिंगे खाली पडल्यावर ओमकार आणि प्रणव या दोघांनी त्यांच्या पाठीत, पोटात लाथेने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सागर हिंगे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर मारहाण करणारे तिघे पळून गेले. यासंदर्भात रोहित मल्हारी भोर, ओमकार मल्हारी भोर व प्रणव भोर यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: One was beaten for demanding money