चोरीला गेलेल्या तीन दुचाकींपैकी एक गाडी सापडली विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:36+5:302021-02-05T05:20:36+5:30

वाघोली : वाघोली-बकोरी रोडवर असणाऱ्या श्रीराम पॅराडाइज सोसायटीच्या मागील बाजूकडून चोरट्यांनी रात्रीच्यावेळी चोरून नेलेल्या तीन दुचाकींपैकी एक दुचाकी सोयासायटीपासून ...

One of the three stolen bikes was found in the well | चोरीला गेलेल्या तीन दुचाकींपैकी एक गाडी सापडली विहिरीत

चोरीला गेलेल्या तीन दुचाकींपैकी एक गाडी सापडली विहिरीत

वाघोली : वाघोली-बकोरी रोडवर असणाऱ्या श्रीराम पॅराडाइज सोसायटीच्या मागील बाजूकडून चोरट्यांनी रात्रीच्यावेळी चोरून नेलेल्या तीन दुचाकींपैकी एक दुचाकी सोयासायटीपासून शंभर मीटर लांब असणाऱ्या विहिरीत सापडली आहे. क्रेनच्या साहाय्याने दुचाकी बाहेर काढली आहे. विहिरीमध्ये फक्त एकच गाडी सापडली असून इतर गाड्यांचा तपास लागलेला नाही.

वाघोली-बकोरी रोडवर असणाऱ्या श्रीराम पॅराडाईज सोसायटीच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या क्लब हाऊसच्या जवळील सहाफुट उंचीचे वॉल कंपाउंड ओलांडून सात चोरटे सोसायटीच्या आवारामध्ये घुसले होते. तीन दुचाकींची चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी सोसायटीतील कॅमेऱ्यांची दिशा बदलून नासधूस केली. पार्किंगमधील तीन दुचाकी ओढून कंपाउंडजवळ नेत सहाफुटाच्या कंपाउंड वरून उचलून चोरटे दुचाकीसह फरार झाले होते. सात दिवसापूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनेनंतर दुपारच्यावेळेस विहिरीच्या मालकांना विहिरीत दुचाकी असल्याचे दिसले. त्यांनी लोणी कंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना दुचाकीची माहिती देऊन क्रेनच्या साहाय्याने दुचाकी बाहेर काढली. दुचाकीचे मालक प्रशांत धर्मराज यांच्यापर्यंत ती गाडी पोहोचवली गेली.

Web Title: One of the three stolen bikes was found in the well