शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आठ महिन्यात एक हजार कोटींचा मिळकत कर जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 20:23 IST

चार महिन्यात ११०० कोटीचे उद्दीष्ट पूर्ण होणार का ? 

ठळक मुद्देयंदा सुमारे ११५ कोटी पेक्षा अधिक मिळकत कर आतापर्यंत अधिक जमा

पुणे : महापालिकेच्या मिळकत कर विभागाने आठ महिन्यात सुमारे १ हजार ३ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ११५ कोटी पेक्षा अधिक मिळकत कर आतापर्यंत अधिक जमा झाला आहे. परंतु यंदा प्रशासनाने मिळकत कर विभागाला तब्बल २१०० कोटी रुपयांचे उद्दीष्ट दिले आहे. यामुळे पुढील चार महिन्यात तब्बल ११०० कोटी रुपयांचे उद्दीष्ट पूर्ण होणार का याबाबत मात्र शंकाच आहे.     शहरामध्ये विविध विकास कामे करण्यासाठी व नव्याने प्रकल्प हाती घेण्यासाठी मिळकत कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. परंतु गेल्या काही वर्षांत मिळकत करामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुट निर्माण होत असून, याचा महापालिकेच्या अंदाजपत्रकावर चांगलाच परिणाम होत आहे. यासाठीच महापालिका आयुक्त व मिळकत कर विभागाने यंदा पहिल्या महिन्यांपासूनच मिळकत कर वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. यामध्ये थकबाकी वसुलीसाठी अधिक भर देण्यात आल्याने यंदा पहिल्या आठ महिन्यांमध्ये सुमारे १ हजार ३ कोटी रुपयांचा मिळकत कर वसूल करण्यात आला आहे. याबाबत सह महापालिका आयुक्त विलास कानडे यांनी सांगितले की, यंदा सुरुवाती पासूनच मिळकत कर वसूलीवर अधिक लक्ष देण्यात आले आहे. यात थकबाकी वसुलीसाठी अधिकचे सेवकांची मदत घेण्यात आली असून, १ नोव्हेंबर पासून बॅन्ड पथकाची मदत घेण्यात आली आहे.     मिळकत कर विभागाने यंदा सुरुवातीपासूनच नियमित मिळकत कर भरणा-या नागरिकांपेक्षा थकबाकीदारांवर अधिक लक्ष केंद्रीत केले. यामुळे १ एप्रिल ते २८ नोव्हेंबर अखेर पर्यंत शहरामध्ये तब्बल ६ लाख ८१ हजार ६०० मिळकत करदात्यांनी १ हजार ३ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे. अद्यापही २ लाख ९७ हजार १०० मिळकत कर धारकांकडून तब्बल ११०० कोटी रुपये वसूल होणार का याचे मोठे आवाहन प्रशासनाच्या समोर आहे. यामध्ये मोठ्या रक्कमांच्या थकबाकीदारांची संख्या अधिक आहे. यामुळेच आता पर्यंत तब्बल २३ हजार ६३५ मिळकत कर धारकांना नोटीसा देण्यात आल्या असून, सुमारे ११५ मिळकती सील करण्यात आल्या असल्याचे कानडे यांनी स्पष्ट केले. पुढील चार महिन्यात जास्तीत जास्त मिळकत कर वसूल करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेTaxकरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका