शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

" हा " छंद जीवाला लावी पिसे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 12:39 IST

या छंदानं त्याच्या आयुष्याला दिशाचं नव्हे तर बळ दिलं आहे.

ठळक मुद्देया छंदाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’ ने घेतली

पुणे : जन्मत:च हदयाला छिद्र असल्यानं त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं. मात्र ऑपरेशन पूर्व चाचणीत अनेक संकटे आली. त्याची दृष्टी गेली...शरीराची डावी बाजू पूर्ण निकामी झाली. आईवडिलांनी हातात ’जिगसॉ पझल’ दिलं...आणि ते सोडवण्याचा त्याला छंद जडला. आश्चर्य वाटेल, पण त्याच्या याच छंदाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’ मध्ये झाली आहे. या छंदानं त्याच्या आयुष्याला दिशाचं नव्हे तर बळ दिलं आहे. कर्वेनगर येथे राहाणा-या सिद्धार्थ भूषण जोशी असे या तरूणाचे नाव आहे. विखुरलेल्या,वेड्या वाकड्या आकाराच्या आणि रंगांच्या तुकड्यांना अत्यंत शांतपणे आणि चिकाटीने जोडत तो चित्र बनवत जातो.लहानपणी खेळण्याच्या दुकानात मिळणारी बारा,पंधरा, चोवीस,तीस,साठ, एकशेविस, दोनशे,तीनशे आणि पाचशे तुकड्यांची असंख्य जिगसॉ पझल त्याने सोडवली पण आता त्या तुकड्यांची संख्या तीन हजारांपर्यंत गेली आहे.आज सुस्थितीत आणि छान फ्रेम करून ठेवलेली दोनशे ते अडीचशे पझल्स त्याच्याकडे पहायला मिळतात.पझल्स पाहून ती पेंटिंग्ज असावीत असा भास होतो. त्याच्या या छंदाची नोंद   ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’  ने घेतली आणि फेब्रुवारी २०१९ ला सर्टिफिकेट देऊन त्यावर शिक्कामोर्तब झाले.    आपल्या मुलाच्या या शारीरिक अवस्थेविषयी हार न मानता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. शरीरावर झालेल्या अनेक दुष्परिणामात चंचलता हा मोठा अडथळा होता.चंचलता कमी व्हावी म्हणून अनेक युक्त्या शोधल्या.जिगसॉ पझल सोडवायला देणे हाही एक उपायच होता.पण तो जमला, त्याला आवडू लागला.खेळाचं रुपांतर थेरपीत आणि थेरपीचं छंदात झालं...असे त्याची आई स्मिता जोशी अभिमानाने सांगतात.----------------------------------------------------------त्याच्या जिददीचा लढा झाला शब्दबद्धआपल्या मुलाची जिदद आणि कुटुंबाने दिलेला लढा आई स्मिता जोशी हिने पुस्तकरूपात शब्दबद्ध केला आहे. पुढील आठवड्यात राजहंस प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.

टॅग्स :Puneपुणे