पैशाच्या वादातून एकावर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST2021-02-09T04:14:05+5:302021-02-09T04:14:05+5:30

याबाबत कल्पना सुभाष सोनवणे (रा. पाबळ फाटा, सय्यदबाबा नगर, शिरूर, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली ...

One stabbed in a money dispute | पैशाच्या वादातून एकावर चाकूने वार

पैशाच्या वादातून एकावर चाकूने वार

याबाबत कल्पना सुभाष सोनवणे (रा. पाबळ फाटा, सय्यदबाबा नगर, शिरूर, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. करण जालिंदर भोळे( रा. पाबळ फाटा, सय्यदबाबा नगर, शिरूर, तालुका शिरूर) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे, दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाबळ फाटा सय्यदबाबा नगर येथे फिर्यादीच्या घरासमोरील रस्त्यावर लहान मुलांच्या वाद झाला. याचा राग मनात धरून व जुन्या पैशाच्या वादाचा राग मनात धरून आरोपी यांनी फिर्यादीचे पती सुभाष यांच्याबरोबर वाद घालून, रागाच्या भरात घरात जाऊन घरातून चाकू आणून फिर्यादीचे पती सुभाष यांच्या पोटावर बरगडीत वार करून जीवघेणा हल्ला केला होता. गंभीर जखमी सुभाष सोनवणे यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी आता

खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे करीत आहे.

Web Title: One stabbed in a money dispute