चिंचवडमध्ये एक गाव एक शिवजयंती
By Admin | Updated: March 16, 2017 01:46 IST2017-03-16T01:46:27+5:302017-03-16T01:46:27+5:30
महान साधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिंचवडमध्ये शिवछत्रपतींचा जन्मोत्सव आनंदात पार पडला. काळभैरवनाथ उत्सव समिती

चिंचवडमध्ये एक गाव एक शिवजयंती
चिंचवड : महान साधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिंचवडमध्ये शिवछत्रपतींचा जन्मोत्सव आनंदात पार पडला. काळभैरवनाथ उत्सव समिती आयोजित अखिल चिंचवडगाव शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवात शिवव्याख्यात्यांनी इतिहासाची ओळख करून देणारे मार्गदर्शन केले. चिंचवडमधील विविध मंडळे, संस्था,व्यापारी,सामाजिक व राजकीय मंडळींना बरोबर घेत एक गाव एक शिवजयंती हा उपक्रम राबविला.
रवींद्र यादव यांनी अपरिचित शिवराय, हभप मंगला कांबळे यांनी हिंदू धर्म संस्कार ,सचिन ढोबळे यांनी छत्रपतींचे शिवचातुर्य,मोहन शेटे यांनी जाणता राजा,प्रसाद मोरे यांनी छत्रपतींचे युद्धतंत्र, शरद पोंक्षे यांनी छत्रपती शिवराय आणि राजकारण व सौरभ कर्डे यांनी छत्रपती शिवराय आणि कविभूषण या विषयी व्याख्यान दिले.
श्री काळभैरवनाथ मंदिर येथे शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.सायंकाळी चापेकर चौकातून शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.ढोल-ताशाचा गजर आणि छत्रपतींचा जयघोष करत हजारो शिवभक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते. चिंचवडगाव, काकडे पार्क, तानाजीनगरमार्गे पालखी सोहळा पुन्हा चापेकर चौकात आला.भगवे फेटे आणि हातात झेंडे घेतलेले अनेक मावळे लक्षवेधी ठरले.
दळवीनगरातील समता तरुण मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. व्याख्यान, पोवाडे व ढोल -ताशांचा गजर करत परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. विविध वेशभूषा करत मिरवणुकीत सहभागी झालेले बालचमू सर्वांचे आकर्षण ठरले.या मिरवणुकीत महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. फुलांची उधळण करीत कार्यकर्त्यांनी छत्रपतींचा जयघोष केला.यासाठी किरण दळवी, अविनाश दळवी, संतोष जाधव, धनंजय खराडे, आशिष पाटील, दिनेश मालुसरे,विजय दळवी, महेश एमबाडे, प्रदीप जाधव, सागर चव्हाण, संतोष दळवी, पप्पू मालुसरे यांनी योगदान दिले. (प्रतिनिधी)