शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

कात्रज दूध उत्पादकांना देणार लिटरमागे एक रुपया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 12:12 IST

शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी दर फरकासह प्रतिलिटर २५.१६ आणि म्हशीच्या दुधासाठी ३६.७२ रुपये प्रतिलिटर दर देण्यात आला आहे....

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत निर्णय : दूध संघांना १४ टक्के लाभांश देण्याचा निर्णय कात्रज येथील दुग्धालयाचे विस्तारीकरण होणारदूध उत्पादकांच्या हातात दिवाळीपुर्वीच अतिरिक्त रक्कम पडणार दूध उत्पादक संघाला राष्ट्रीय स्तरावरील क्वालिटी हे गुणवत्ता व शुद्धतेची हमी असलेले चिन्ह

पुणे : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने (कात्रज) दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरफरकापोटी प्रतिलिटर एक रुपया देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ७ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या हातात दिवाळीपुर्वीच अतिरिक्त रक्कम पडणार आहे. या शिवाय संघाचे सभासद असलेल्या दूध संघांना १४ टक्के लाभांशापोटी तब्बल ८१ लाख ५१ हजार रुपये देण्याचा निर्णयही वार्षिक सर्वसाधारण सभेत मंगळवारी घेण्यात आला. दूध उत्पादक संघाची ६०वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. दूध उत्पादक संघाला राष्ट्रीय स्तरावरील क्वालिटी हे गुणवत्ता व शुद्धतेची हमी असलेले चिन्ह मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. असे चिन्ह मिळालेला पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ हा राज्यातील पहिला संघ ठरला आहे. शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी दर फरकासह प्रतिलिटर २५.१६ आणि म्हशीच्या दुधासाठी ३६.७२ रुपये प्रतिलिटर दर देण्यात आला आहे. वर्षभरातील दरफरकापोटी एक रुपये प्रतिलिटर प्रमाणे शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम मिळणार आहे.  उत्पादक संघाने दूध संकलनासाठी १३५ बल्क मिल्क कुलर बसविले असून, १५० मिल्क पार्लर सुरु केले आहेत. नवी मुंबई, मुंबई, नाशिक, वसई या ठिकाणी संघाने दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण सुरु करण्यात आले आहे. संघाची उलाढाल २९१.९५ कोटी रुपयांची असून, निव्वळ नफा २.४८ कोटी रुपये झाला असल्याची माहिती पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी दिली. अवसरी, व्यंकोजी, श्री महेश्वर, नायफड, स्वामी समर्थ, साईबाबा,  शिवामृत, नारायणगाव, मुक्ताई, काळुबाई, स्वामी विवेकानंद, उरावडे आंबेगाव, सावित्रिबाई फुले, नागेश्वर आणि नेरे विभाग या सहकारी दूध उत्पादक संघाना उत्कृष्ट संघाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रत्येकी ११ हजार आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. --------------उत्पादक संघाचे विस्तारीकरण होणारकात्रज येथील दुग्धालयाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत वेगवेगळ््या दूग्धजन्य पदार्थांसाठी राष्ट्रीय दूग्ध विकास बोर्डाच्या सहकायार्ने ८४ कोटी रुपयांचा अत्याधुनिक व स्वयंचलित उत्पादन केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच, कोंढापूरी शीतीकरण केंद्र येथे ३ कोटी रुपयांचा पशूखाद्य कारखाना देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने देण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेmilkदूधFarmerशेतकरी