वाळूतस्करांकडून एकाला मारहाण

By Admin | Updated: December 8, 2015 00:09 IST2015-12-08T00:09:57+5:302015-12-08T00:09:57+5:30

ओढ्यामधील वाळू काढत असल्याची माहिती तहसीलदार यांना दिल्याने कारवाई झाल्याचा राग मनात धरून वाळूतस्करांनी एकाला बेदम मारहाण केल्याने तो

One of the rebels killed | वाळूतस्करांकडून एकाला मारहाण

वाळूतस्करांकडून एकाला मारहाण

यवत : ओढ्यामधील वाळू काढत असल्याची माहिती तहसीलदार यांना दिल्याने कारवाई झाल्याचा राग मनात धरून वाळूतस्करांनी एकाला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. ६) चौफुला (ता. दौड) येथे घडली.
मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली धनाजी गवळी (वय ३२, रा. गवळीमळा, हातवळण, ता. दौड) असे असून याबाबतची फिर्याद त्यांचा भाऊ भरत गवळी यांनी यवत पोलिसात दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी बेकायदा जमाव जमवून गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा आरोपी सतीश टेंगले (रा. दापोडी, ता. दौंड), धनंजय टेंगले, प्रकाश टेंगले, विजय दिवेकर (तिघेही रा. वरवंड, ता. दौंड), अनिल धावड़े (रा. कडेठाण, ता. दौंड) व इतर दोघांनी यांच्याविरोधात दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, माऊली धनाजी गवळी यांच्या हातवळण गावच्या हद्दीत असलेल्या शेतापासून काही अंतरावर असलेल्या ओढ्यामधून वरील आरोपी वाळूउपसा करीत होते. मागील पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्यावर दौंड तहसीलदार यांनी कारवाई केली होती. ती वाळू काढत असल्याची माहिती गवळी यांनी तहसीलदार यांना दिल्याचा समज करून घेतला होता. याचा राग मनात धरून आरोपींनी माऊली गवळी गाडी धुण्यासाठी वॉशिंग सेंटरमध्ये गेले असता त्यांना बोलावून घेत आमची माहिती दिल्याने ७ लाखांचे
नुकसान झाले. वाहने उभी राहिली. आता तुला सोडणार नाही, असे म्हणत लोखंडी पाइप व टॉमी यांनी जबर मारहाण केली.
जखमी अवस्थेत गवळी यांना यवतमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथून ससून हॉस्पिटल पुणे येथेदेखील हलविण्यात आले. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: One of the rebels killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.