शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut : संजय राऊत धमकी प्रकरणी पुण्यातून एक व्यक्ती ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 11:32 IST

खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सॲपद्वारे मिळाल्याची माहिती समोर आली होती

खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सॲपद्वारे मिळाल्याची माहिती समोर आली होती. ”तू दिल्लीमध्ये भेट तुला एके ४७ ने उडवतो, तुझा मूसेवाला करतो तू आणि सलमान फिक्स," अशा आशयाची ही धमकी असून याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिल्याचेही समोर आले होते. दरम्यान, यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एकाला ताब्यात घेतलं आहे.

राहुल तळेकर असं त्या व्यक्तीचं नाव असून पुण्यातील गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलं. मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस यांच्या गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई करत पुण्यातील खराडी भागातून राहुल तळेकर या व्यक्तीला ताब्यात घेतलंय.

ताब्यात घेतल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राहुल तळेकर या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरातील जयशंकर हॉटेलमधून या तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबई पोलिसांनी माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी कारवाई करत लगोलग या तरुणाला ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या ताब्यात सोपवलं. मुंबई पोलीस या तरुणाला घेऊन रात्रीच रवाना झाले.

काय आहे प्रकरण?"तू दिल्लीमध्ये भेट तुला एके ४७ ने उडवतो, तुझा मूसेवाला करतो तू आणि सलमान फिक्स," अशा आशयाची ही धमकी संजय राऊत यांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्यानंतर यासंदर्भातील माहिती पोलिसांना देण्यात आली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPuneपुणे