एक व्यक्ती पालिकेस वेठीस धरतोय

By Admin | Updated: September 2, 2016 05:41 IST2016-09-02T05:41:57+5:302016-09-02T05:41:57+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, गेली १५ ते २० वर्षे एक व्यक्ती महापालिकेस वेठीस धरतो आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी अजित

One person is caught by the police | एक व्यक्ती पालिकेस वेठीस धरतोय

एक व्यक्ती पालिकेस वेठीस धरतोय

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, गेली १५ ते २० वर्षे एक व्यक्ती महापालिकेस वेठीस धरतो आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी अजित पवार यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीचा पदभार प्रदान सोहळा गुरुवारी भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार सुजितसिंह ठाकूर, मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, एकनाथ पवार, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता भाजपाकडे दिल्यास महिलांसाठी विशेष योजना राबविण्यात येतील. समाजाचा केंद्रबिंदू हा महिला असून, आगामी काळात त्यांच्या सक्षमीकरणास अधिकाधिक प्राधान्य दिले जाईल.
लक्ष्मण जगताप म्हणाले की, महापालिकेत ६४ जागा
महिलांसाठी रिक्त असल्यामुळे महिलांना नगरसेवक पद भूषविण्याची मोठी संधी चालून आली आहे. त्यामुळे महिलांची जबाबदारी वाढली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: One person is caught by the police