एकतर्फी प्रेमातून तरूणीवर हल्ला

By Admin | Updated: October 30, 2014 00:03 IST2014-10-30T00:03:39+5:302014-10-30T00:03:39+5:30

दिघी येथे एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने महाविद्यालयीन युवतीवर चाकूने हल्ला करून तिच्यावर 2क् वार केले, यामध्ये ती गंभीर जखमी झाली

One-on-one love raids on teenage girl | एकतर्फी प्रेमातून तरूणीवर हल्ला

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर हल्ला

पुणो : दिघी येथे एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने महाविद्यालयीन युवतीवर चाकूने हल्ला करून तिच्यावर 2क् वार केले, यामध्ये ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दिघी येथे दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. त्या तरूणाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सत्यवान हळवे (वय 27, रा. दिघी) असे त्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी विo्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास ती क्लासला जाण्यासाठी निघाली होती, त्यावेळी त्या तरूणाने तिला हटकले. त्यानंतर अचानक चाकूने तिच्यावर सपासप वार करण्यास सुरूवात केली. त्याच्या या हल्ल्यामध्ये ती जागेवरच कोसळली.  (प्रतिनिधी)

 

Web Title: One-on-one love raids on teenage girl