स्फोटक वापरल्याप्रकरणी एकावर गुन्हा
By Admin | Updated: September 24, 2015 02:58 IST2015-09-24T02:58:06+5:302015-09-24T02:58:06+5:30
स्फोटक पदार्थ वापरण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गुळुंचवाडी येथील एकजणाविरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

स्फोटक वापरल्याप्रकरणी एकावर गुन्हा
आळेफाटा : स्फोटक पदार्थ वापरण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गुळुंचवाडी येथील एकजणाविरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिली.
येथील शिवाजी सुखदेव गुंजाळ यांच्या राहत्या घरात निष्काळजीपणे सुरक्षितेची उपाययोजना न करता आरोग्यास धोका अशा अवस्थेत १८ डिटोनेटर, ३ जिलेटन कांड्या, २५ इलेक्ट्रिक कनेक्टर असा १0७0 रुपयांचा वापरल्याच्या नोंदी न ठेवलेला स्फोटक पदार्थांचा साठा आळेफाटा पोलिसांना मिळाला. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)