बलात्कारप्रकरणी एकावर गुन्हा
By Admin | Updated: March 31, 2015 00:27 IST2015-03-31T00:27:03+5:302015-03-31T00:27:03+5:30
सांगवी (ता. बारामती) येथील विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बलात्कारप्रकरणी एकावर गुन्हा
बारामती : सांगवी (ता. बारामती) येथील विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दत्तु भगवान गायकवाड (रा. सांगवी, ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती मद्यपी असल्याने विवाहिता पतीसमवेत राहत नव्हती. नोव्हेंबर २०१४ तसेच नंतर दोन वेळा विवाहिता एकटी असताना घरात प्रवेश करुन बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देखील त्याने दिली होती. (प्रतिनिधी)