एक कोटीचे सापाचे विष जप्त

By Admin | Updated: March 19, 2016 02:52 IST2016-03-19T02:52:03+5:302016-03-19T02:52:03+5:30

दत्तवाडी पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोल्हापूरच्या दोघांना पकडत एक कोटी रुपयांचे सापाचे विष जप्त केले आहे. पोलिसांनी कोल्हापूरच्या दोन जणांना

One million snake venom seized | एक कोटीचे सापाचे विष जप्त

एक कोटीचे सापाचे विष जप्त

पुणे : दत्तवाडी पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोल्हापूरच्या दोघांना पकडत एक कोटी रुपयांचे सापाचे विष जप्त केले आहे. पोलिसांनी कोल्हापूरच्या दोन जणांना गजाआड केले असून, आरोपी हे विष साडेपाच कोटी रुपयांना विकणार होते, अशी माहिती दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दिली.
महेश सुरेश पाटील (वय ३५, रा. घोडकेनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) आणि विजय राजाराम कुंभार (वय ३३, रा. हरळी खुर्द, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी आरोपींची नावे आहेत. निरीक्षक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील विष विकण्यासाठी महेश आणि विजय पुण्यात येणार असल्याची माहिती पोलीस नाईक रवींद्र फुलपगारे यांना मिळाली होती.
ही कारवाई उपायुक्त पंकज डहाणे,
स्वारगेट विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव, निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव, राजू चव्हाण, उपनिरीक्षक दत्ताजी मोहिते, नीलेश साळुंके, पोलीस कर्मचारी तानाजी निकम, रवींद्र फुलपगारे, गणेश सुतार, नवनाथ मोहिते, अशोक गवळी आणि बोडरे यांच्या पथकाने केली.

Web Title: One million snake venom seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.