शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल एक लाखांचा मुद्देमाल केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 17:11 IST

पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई

ठळक मुद्देसखोल चौकशी केल्यावर आरोपीने गुटखा नारायणगाव येथून खरेदी करून विक्रीसाठी आणला असल्याची दिली कबुली

राजगुरुनगर: खेडपोलिस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सुमारे एक लाख ८८ हजार रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला व तंबाखू आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. अक्षय जयवंत शिंगोटे (वय २०),  संतोष अंतुनाथ चव्हाण (वय ४०), अकलाब अब्दुलसत्तार आतार (वय ४५ ) हे दोन्ही रा.नारायणगाव अशी आरोपीची नावे असून खेडपोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 

नारायणगाव येथून एक व्यक्ती राजगुरुनगर येथे गुटखा घेऊन विक्रीसाठी मोटारसायकलवर येणार आहे. अशी माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरिक्षक भारत भोसले आणि त्यांच्या पथकाने पानमळा येथे पुणे -नाशिक महामार्गावर सापळा रचला होता.

दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एक जण मोटार सायकल वर एक पोते घेऊन येत असल्याचे पोलिसांना दिसले. त्याला ताब्यात घेतल्यावर जवळील पोत्यामध्ये सुमारे ५० हजार रुपयांचा गुटखा मिळून आला. सखोल चौकशी केल्यावर त्याने अक्षय जयवंत शिंगोटे असे नाव सांगून गुटखा नारायणगाव येथून खरेदी करून विक्रीसाठी आणला असल्याची पोलिसांना कबुली दिली. खेड पोलिसांनी नारायणगाव येथे जाऊन पोलिसांच्या मदतीने संतोष अंतुनाथ चव्हाण, अकलाब आतार यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला वेगवेगळया प्रकाराचा गुटखा, तंबाखु असा १ लाख ३७ हजार रुपयांचा अवैधरित्या बाळगलेला गुटखा जप्त केला. एक मोटारसायकल जप्त करुन आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलिस निरिक्षक सतीश गुरव करत आहे. 

टॅग्स :PuneपुणेKhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी