शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर येथे गॅस एजन्साचे शटर उचकटून एक लाख लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 20:33 IST

थेऊर (ता.हवेली ) येथील गॅस एजन्सीचे शटर उचकटून चार अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७ हजार १४४ रुपये चोरून नेल्याची घटना घडली.

ठळक मुद्देसीसीटिव्हीमध्ये चोरटे कैद : अज्ञात चोरट्यांविरोधांत फिर्याद

लोणी काळभोर : थेऊर (ता.हवेली ) येथील गॅस एजन्सीचे शटर उचकटून चार अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७ हजार १४४ रुपये चोरून नेल्याची घटना घडली. सीसीटिव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. या चोरीप्रकरणी अमोल तात्यासाहेब काळे (रा. भिमनगर जवळ, थेऊर, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल काळे यांची थेऊर येथे गॅस एजन्सी असून तेथे जमा होणारी रक्कम ते दोन टप्प्यांत बँकेत भरतात. ६ आॅगस्ट रोजी जमा झालेली रक्कम एजन्सीचे व्यवस्थापक गायकवाड यांनी सकाळी १० - ३० वाजण्याच्या सुमारास बँकेत जमा केली. त्यानंतर दिवसभर जमा झालेली रक्कमेचा भरणा त्यांनी दुपारी ३ - ३० वाजण्याच्या सुमारास बॅकेत केला. त्यानंतर जमा झालेली १ लाख ७ हजार १४४ रुपयेची रक्कम त्यांनी मोजून गॅस एजन्सी कार्यालयातील ड्रॉवर मध्ये ठेवली. व एजन्सी सायंकाळी नेहमीप्रमाणे ७ - ३० वाजण्याच्या सुमारास बंद केली. ७ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काळे नेहमीप्रमाणे एजन्सी उघडण्यास गेले. त्यावेळी त्यांना कार्यालयाचे लोखंडी शटर अर्धवट ऊघडे असलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता त्यांना कार्यालयातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले व पैसे ठेवलेले ड्रॉवर उघडे तसेच त्यात ठेवलेली रक्कम दिसली नाही. म्हणून त्यांनी सीसीटिव्ही फुटेज पाहिले असता त्यांना चार इसमांनी सदर रक्कम चोरी करून नेले असल्याचे आढळून आले. म्हणून त्यांनी चार अज्ञात चोरट्यांविरोधांत फिर्याद दिली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसLoni Kalbhorलोणी काळभोरtheftचोरी