शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पुण्यात आज एका दिवसात एक लाख लोकांचे लसीकरण.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 08:36 IST

अठरा वर्षा वरील लोकांचे सरसकट लसीकरण करण्यात यावे तसेच लसीचे जादा डोस मिळावे या मागणीसाठी प्रयत्न.

कोरोनाने ग्रासलेल्या पुण्यामध्ये आज एक अनोखा प्रयोग करण्यात येत आहे. आज एका दिवसात तब्बल एक लाख लोकांचं लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज ४५ वर्षांच्या वरील सर्व लोकांचे लसीकरण सुरू केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज हा प्रयत्न केला जातो आहे.पुणे प्लॅटफॉर्म फोर कोव्हीड रिस्पॉन्स यांच्या वतीने हा प्रस्ताव देण्यात आला होता. शहर तसे जिल्हा प्रशासनाकडून आज याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

 

पुणे शहरांमधील आणि जिल्ह्यामधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. कालच पुणे शहरामध्ये जवळपास साडेचार हजार रुग्ण सापडले तर जिल्ह्याची संख्या साडेआठ हजारांवर गेली आहे. ही परिस्थिती आणखी बिघडू शकते अशी शक्यता तज्ञ वर्तवत आहेत. आणि त्यामुळेच शहरामध्ये लसीकरणा चा वेग वाढवला जावा अशी मागणी गेले काही दिवस सातत्याने पुढे येत आहे.

 

याचाच भाग म्हणून पुण्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे शक्‍य आहे हे दाखवण्यासाठी आज एक लाख लोकांचे लसीकरण एकाच दिवशी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जास्त लसीकरण करण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे जास्त लसी पुरविल्या जाव्यात अशी मागणी या माध्यमातून केली जाणार आहे. 

 

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लसीचा तुटवडा जाणवत होता. मात्र काल जवळपास तीन लाख डोस जिल्हा शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये वाटले गेले आहेत. लस उपलब्ध झाल्यामुळेच जास्तीत जास्त लसीकरणाचा हा प्रयोग राबवला जाणार आहे.

 

पुणे प्लॅटफॉर्मवर फोर कोव्हीड रिस्पॉन्स चे प्रमुख सुधीर मेहता यांच्या मते पुण्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन इथे सरसकट लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारकडे ही अशी मागणी करण्यात आलेली आहे. आणि जास्तीत जास्त लोकांच्या लसीकरण करणे शक्य आहे हे दाखवण्यासाठी एकाच दिवशी एवढी लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. क्षमता असल्याचे सिद्ध झाल्यास आणखी लसींची मागणी करणे शक्य होईल. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या