शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जेवणात कापसाचा बोळा आढळल्याप्रकरणी जहांगिर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 20:42 IST

जहांगिर हॉस्पिटलमधील एका महिला रुग्णाच्या जेवत कापसाचा बोळा आढळल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने जहांगिर हॉस्पिटलला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देहॉस्पिटलमधील कँटिनची तपासणी, त्रुटी पूर्ततेचा अहवाल सादर करण्यासाठी नोटीस कँटिनमध्ये मे महिन्याअखेरपर्यंत सुधारणा करण्यास संधी

पुणे: जहांगिर हॉस्पिटलमधील एका महिला रुग्णाच्या सूपात कापसाचा बोळा आढळल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने जहांगिर हॉस्पिटलला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच हॉस्पिटलमधील कँटिनची तपासणी केल्यानंतर आढळून आलेल्या त्रुटी पूर्ततेचा अहवाल सादर करण्यासाठी नोटीस बजावली असून कँटिनमध्ये मे महिन्याअखेरपर्यंत सुधारणा करण्यास संधी दिली आहे. हॉस्पिटलच्या कँटीनमधून रुग्णांना दिल्या जाणा-या सूपात कापसाचे बोळे आढळल्याप्रकरणी हडपसर येथील महंमदवाडीचे रहिवासी महेश सातपुते यांनी एफडीएकडे हॉस्पिटल प्रशासन, पोलीस, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यावर एफडीएच्या अधिका-यांनी कँटीनची तपासणी केली. त्यात रुग्णालयातील कँटिनमध्ये अस्वच्छता आढळून आली. तसेच अन्न पदार्थ तयार करणा-या व्यक्तींसाठी व हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी एकच स्वच्छतागृह असल्याचे समोर आले. परंतु,कँटिनमधील सर्व उपकरणे योग्य स्थितीत असल्याचे तपासणीतून दिसून आले. मात्र, कँटिनमध्ये अस्वच्छता असल्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस.काकडे यांनी एफडीएचे पुणे विभागीय सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्याकडे हॉस्पिटल विरोधात खटला दाखल केला. बुधवारी हॉस्पिटल प्रशासनाला बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात आली होती. देशमुख यांनी एफडीएच्या अधिका-यांचे आणि हॉस्पिटलचे म्हणणे ऐकूण घेतल्यावर हॉस्पिटला एक लाख रुपये दंड केला,असे एफडीएच्या सहायक आयुक्त ए.ए.भोईटे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलFDAएफडीए