शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात अपघातात एक ठार, दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 23:13 IST

कात्रज-मंतरवाडी बायपासवर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला आहे तर दोनजण जखमी झाले आहेत. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे, दि. ८ - कात्रज-मंतरवाडी बायपासवर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला आहे तर दोनजण जखमी झाले आहेत. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.अपघातात प्रकाश विलास माने (वय३५) रा. भामेरी, इस्लामपूर यांचा मृत्यू झाला. तर सदाशिव चौटा रा. कल्याण व कंटेनरचालक संतोष डोंगरे हे जखमी झाले आहेत. राजकरण रामलाल कोरी (रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक कात्रज कडून खडी मशीन चौकाकडे जात असताना कोंढवा पोलीस चौकीसमोर तीव्र उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि  त्याने सात वाहनांना उडविले. यात छोटा टेम्पो, सोर्क्पिओ गाडी,  कंटेनर, एक मालवाहतूक करणारा टेम्पो व मारुती कार अशा वाहनांना ट्रकने उडविले. यात  टेम्पोचालक माने मरण पावला तर  गाडीचालक  चौटा  व कंटेनरचालक संतोष डोंगरे हे जखमी झाले आहेत. जखमींना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या अपघातामुळे कात्रज-मंतरवाडी बायपासवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. कोंढवा वाहतूक शाखेचे पोलींस निरीक्षक निंबाळकर व त्यांच्या सहकारी वाहतुक पोलीस यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतुक सुरळीत केली.

टॅग्स :Accidentअपघात