शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सातारा महामार्गावर १ ठार, सात जखमी : चालकाचे नियंत्रण सुटून कार ट्रकवर आदळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 05:18 IST

सातारा-पुणे महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कारमधील एक जण ठार तर अन्य सात जण जखमी झाले.

नसरापूर : सातारा-पुणे महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कारमधील एक जण ठार तर अन्य सात जण जखमी झाले. पुणे बाजूकडे जाणा-या पुणे येथील कार (एमएच १४ डी.अ‍े. ९९६०) मधील सर्वोत्तम देवीदास जोशी (वय ६२, रा. कर्वे रोड, पुणे)हे उपचाराअगोदरच ठार झाले तर अन्य ७ जण जखमी आहेत. एक लहान मुलगी व एका महिलेचा समावेश आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, भोसरी पुणे येथील एका कंपनीमधील कर्मचारी शुक्रवारी महाबळेश्वर येथे सहलीसाठी गेल्याचे समजते. तेथून परत पुण्याकडे येताना कापूरव्होळ- हरिश्चंद्री गावच्या हद्दीत सातारा पुणे महामार्गावर पुणे बाजूकडे कार जात असताना कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाच्या डाव्या बाजूकडून रस्त्याच्या उजव्या बाजूस विरुद्ध दिशेला गेली.त्या वेळी पुणे बाजूकडून येणाºया ट्रकवर (एमएच ११ बीडी ६००३) आदळली. मात्र ट्रकच्याझालेल्या धडकेने कार परत पुणे बाजूकडे जाणा-या रस्त्यावर जाऊन पडली. यात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.घटनास्थळी किकवी पोलीस चौकीचे निवास जगदाळे, अनिता रवळेकर, यादव पोलीस आणि पो. नि. सुनील गोडसे ताबडतोब येऊन ग्रामस्थांच्या मदतीने या अपघातातील जखमींना नसरापूर येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले आहे.जखमींची नावे पुढीलप्रमाणे: प्रसाद चंद्रकांत गुजर (वय ४५, रा. मार्केट यार्ड, पुणे), विनायक दीक्षित (वय ४०,रा.सूस रोड, पाषाण, पुणे) तर उर्वरित अन्य ५ जण रा. बावधन पुणे येथील किशोर मेघराज धूत (वय ६०), श्वेता आशिष धूत (वय ३४), कविता आशिष धूत (वय ३), बाबूलाल बलादेराम बिसनोट्टी (वय ४५), अशोक गौर (वय २३) यांचा समावेश आहे. सर्वोत्तम देवीदास जोशी (वय ६२, रा. कर्वे रोड, पुणे) हे उपचाराअगोदरच ठार झाले.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात