जाहिरातीच्या ३५ फूट उंचीच्या बोर्डवरून एकजणाची उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:12 IST2021-09-24T04:12:45+5:302021-09-24T04:12:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेल्या एका जाहिरातीच्या बोर्डवरून एका अज्ञाताने उडी मारली. जवळपास ३५ ...

One jumps off a 35-foot billboard | जाहिरातीच्या ३५ फूट उंचीच्या बोर्डवरून एकजणाची उडी

जाहिरातीच्या ३५ फूट उंचीच्या बोर्डवरून एकजणाची उडी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेल्या एका जाहिरातीच्या बोर्डवरून एका अज्ञाताने उडी मारली. जवळपास ३५ फूट उंचीवरून त्याने उडी मारल्याने त्याच्या पायाला जखम झाली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. पोलिसांनी जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल केले आहे. उडी मारण्याचे कारण समजू शकले नाही.

गुरुवारी दुपारी एक अनोळखी व्यक्ती स्थानकाच्या आवारात असलेल्या एका जाहिरातीच्या मोठ्या होर्डिंगवर चढला. याची माहिती मिळताच घटनस्थळी आरपीएफ, लोहमार्ग पोलीस, स्थानिक पोलीस पोहोचले. त्याला खाली उतरविण्यासाठी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे कर्मचारी संजय गायकवाड यांच्यासह अन्य दोन कर्मचारी अन्य लोकांच्या मदतीने खाली मोठी जाळी घेऊन उभे राहिले. त्याच दरम्यान काही तरुण होर्डिंगवर चढून त्याला खाली आणण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने खाली उडी मारली. यात तो जखमी झाला आहे. पुणे लोहमार्ग पोलिसांत याची नोंद झाली.

Web Title: One jumps off a 35-foot billboard