वाल्हे आरोग्य केंद्राअंतर्गत महालसीकरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:41+5:302021-09-02T04:24:41+5:30
यावेळी बोलताना तहसीलदार रूपाली सरनौबत म्हणाल्या, महालसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, डॉक्टर, नर्स, सरपंच ...

वाल्हे आरोग्य केंद्राअंतर्गत महालसीकरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण
यावेळी बोलताना तहसीलदार रूपाली सरनौबत म्हणाल्या, महालसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, डॉक्टर, नर्स, सरपंच व उपसरपंच सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी व कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,आशा वर्कर्स, अंगणवाडी शिक्षिका व सेविका, संगणक ऑपरेटर आदींना सहकार्य करणारे ग्रामस्थ व लसीकरणासाठी उपस्थित नागरिक यांनी सकाळी ९ वाजल्यापासून ते संध्याकाळी ८ पर्यंत आपआपली जबाबदारी स्वीकारुन अहोरात्र परिश्रम घेतले. त्यामुळेच आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी निर्विघ्नपणे पार पाडू शकलो. येणाऱ्या पुढच्या काळातही आपण सर्वजण एकत्रितपणे काम करून येणाऱ्या तिसऱ्या लाटेपासून स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा त्याचप्रमाणे गावाचा व पर्यायाने देशाचा या कोरोना महामारीच्या संकटावर मात करून बचाव करू याबद्दल तीळमात्र शंका नाही.
यावेळी सर्कल संदीप चव्हाण, तलाठी नीलेश अवसरमोल, आनंद पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला जाधव, वाल्हे केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे, डॉ. अदित्य धारूडकर, पर्यवेक्षक राजेंद्र दळवी, पर्यवेक्षिका संजीवनी दरे, आरोग्यसेविका धनाश्री राऊत, मनीषा पवार, किशोर काळोखे, आशासेविका व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
--
फोटो क्रमांक - ०१वाल्हे महालसीकरण
फोटो ओळी : वाल्हे येथील महालसीकरण मोहिमेची पाहणी करताना तहसीलदार रूपाली सरनोबत यावेळी संदीप चव्हाण, नीलेश अवसरमोल आदी.
010921\01pun_2_01092021_6.jpg
फोटो ओळी : वाल्हे येथील महालसीकरण मोहिमेची पाहणी करताना तहसीलदार रुपाली सरनोबत यावेळी संदीप चव्हाण, निलेश अवसरमोल आदी