एका तासात शहर झाले चकाचक...

By Admin | Updated: July 13, 2015 03:47 IST2015-07-13T03:47:33+5:302015-07-13T03:47:33+5:30

संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा शहरात विसावल्यानंतर रात्री साडे नऊच्या सुमारास अवघ्या तासाभरात महापालिकेच्या

In one hour the city was shocked ... | एका तासात शहर झाले चकाचक...

एका तासात शहर झाले चकाचक...

पुणे : संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा शहरात विसावल्यानंतर रात्री साडे नऊच्या सुमारास अवघ्या तासाभरात महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी तब्बल ६० टन कचरा संकलीत करून शहर चकाचक केले.
एकीकडे संपूर्ण शहरच या पालखी सोहळ्यासाठी आपआपल्या परीने वैष्णवांची सेवा करीत असताना, या कर्मचाऱ्यांनीही अशा प्रकारे सेवा बजावून आपली भूमिका चोखपणे बजावली.
या दोन्ही पालख्या रात्री साडेनऊच्या सुमारास भवानीपेठ येथील पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंग्या विठोबा मंदिरात विसावल्यानंतर या पालखी सोहळ्यामागे असलेल्या सर्व दिंड्या आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर विश्रांतवाडी ते भवानीपेठ आणि बोपोडी ते भवानी पेठ या दोन्ही मार्गावर महापालिकेकडून तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यासाठी जवळपास दोन हजार सफाई कर्मचाऱ्यांची फौज स्वच्छतेच्या साधनांसह सज्ज ठेवण्यात आली होती.
(प्रतिनिधी)

Web Title: In one hour the city was shocked ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.