शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एकच ध्यास.. हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक पटकावयाचाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:28 IST

- नऊ संघ अंतिम फेरीत शनिवारी-रविवारी होणार सादरीकरण; विद्यार्थ्यांची कसून तयारी सुरू

पुणे : आमची एकांकिका अंतिम फेरीत पोहोचल्याचा आनंद आहेच, पण आठही संघ तितकेच ताकदीचे असल्याने आम्ही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कसून तयारी करीत आहोत. आम्ही प्राथमिक फेरीत नाट्य संकल्पना, संवाद लेखन आणि अभिनयाकडे विशेष लक्ष दिले. मात्र, प्रत्यक्ष सादरीकरणावेळी ज्या त्रुटी आढळल्या. त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी आस्था काळे हिने सांगितले.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या नऊ संघांची अंतिम फेरी भरत नाट्य मंदिरात होत आहे. शनिवारी (दि. १३) सायंकाळी ५ ते ८ तर रविवारी (दि. १४) सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळात सहभागी संघांचे सादरीकरण होणार आहे. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित हीरक महोत्सवी स्पर्धेच्या पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरण्यासाठी अंतिम फेरीतील नऊ संघ करंडक पटकावयाचाच या जिद्दिने आणि ध्यासाने स्पर्धेत उतरले आहेत. त्यानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. 

महाविद्यालयाने यापूर्वी स्पर्धेत विविध बक्षिसे मिळविली आहेत. पण यंदाचा संघ पूर्णपणे नवीन आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर आमच्या महाविद्यालयाला स्पर्धेत सहभाग मिळाला ही आमच्या दृष्टीने मोठी संधी आहे. अंतिम फेरीत पोहोचल्याने उत्साह दुणावला आहे. अंतिम फेरीत शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न आहे. - पार्थ करपे, श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेतला आणि अंतिम फेरीत पोहोचलो. अंतिम फेरीत सादरीकरणासाठी सर्वच जण उत्सुक आहोत. अंतिम फेरीच्या दृष्टीने जे थोडेफार बदल केले आहेत. ते नक्कीच पसंतीस पडतील असा विश्वास आहे. - प्रसाद लोहकरे, डीईएस, पुणे युनिर्व्हसिटी 

स्पर्धेच्या पहिल्या वर्षापासून महाविद्यालयाने दर्जेदार एकांकिका दिल्या आहेत. स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने स्पर्धेतील सहभाग आमच्या दृष्टीनेही मोलाचा आहे. सलग तिसऱ्या वर्षी आमचे महाविद्यालय अंतिम फेरीत पोहोचले आहे. यंदा एकांकिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना नवा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आहे. - उर्व चिंचवडे, स. प. महाविद्यालय 

महाविद्यालय अनेक वर्षांपासून स्पर्धेत सहभागी होत असून स्पर्धेत विविध पारितोषिकेही मिळाली आहेत. प्राथमिक फेरीत उत्कृष्ट सादरीकरण करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला असल्याने अंतिम फेरीत अधिक नेटकेपणाने सादरीकरणाचा प्रयत्न आहे. - तुकाराम लव्हरे, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय 

महाविद्यालय अंतिम फेरीत चौथ्यांदा पोहोचले आहे. स्पर्धेचे दडपण आहे; परंतु प्रयोग व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आहेच. दशावतारावर नाटक आधारित असल्याने आम्ही बराच अभ्यास केला. स्पर्धेमुळे जुन्या परंपरांचा अभ्यास झाल्याने अंतिम फेरीतील सादरीकरणाची उत्सुकता आहे. - अनिकेत खरात, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड 

वास्तववादी विषय हीच आमच्या एकांकिकेची ताकद आहे. प्राथमिक फेरीत प्रामाणिकपणे सादरीकरण केल्याने महाविद्यालय अंतिम फेरीत पोहोचले आहे. यंदा आमच्या एकांकिकेला करंडक मिळेल असा विश्वास असून त्या दृष्टीने तयारी सुरू आहे.  - रागिणी आळंदकर, पुणे विद्यार्थिगृहाचे अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालय 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड