वीज पडून एकाचा मृत्यू; दोन जखमी
By Admin | Updated: May 20, 2014 04:45 IST2014-05-20T04:45:53+5:302014-05-20T04:45:53+5:30
१८ मे रोजी सायंकाळी ६.३०च्या सुमारास गारांसह मुसळधार पाऊस झाला. तसेच, जेजुरकरमळा या ठिकाणी बाभळीच्या झाडावर वीज पडल्याने त्या ठिकाणी उभा असलेला मारुती प्रकाश वाघ (वय ७) या मुलाचा मृत्यू झाला,

वीज पडून एकाचा मृत्यू; दोन जखमी
जुन्नर : निरगुडे (ता. जुन्नर) येथे १८ मे रोजी सायंकाळी ६.३०च्या सुमारास गारांसह मुसळधार पाऊस झाला. तसेच, जेजुरकरमळा या ठिकाणी बाभळीच्या झाडावर वीज पडल्याने त्या ठिकाणी उभा असलेला मारुती प्रकाश वाघ (वय ७) या मुलाचा मृत्यू झाला, तर गीता वाघ (वय १७ ) व अंकुश वाघ (वय १०) हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जुन्नर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार डी. आर. गेंजे यांनी दिली. निरगुडे येथील घटनेची खबर जुन्नर पोलीस ठाण्याला विकास वाघ (रा. येणेरे) यांनी दिली. त्याचबरोबर जुन्नर येथील रोकडे मारुती मंदिराजवळील झोपडीवर १८ मे रोजी रात्री ८ वाजता अवकाळी पाऊस व सुसाट हवेमुळे वडाचे मोठे झाड तुटून झोपडीवर पडले. त्यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही; पंरतु चार जण जखमी झाले. त्यात हिना मदारी (वय १०), सुलेमान मदारी (५५), उषा शर्मा (४०) व शाहरुख मदारी (१६), असे चौघे जखमी झाले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे झोपडीत झोपलेल्यांपैकी सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.