शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका चालकांच्या आडमुठेपणामुळे गेला एकाचा जीव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 02:14 IST

केवळ १०८ रुग्णवाहिका चालकांनी येण्यास नकार दिल्याने तीन तास वेदनेने तळमळत असलेल्या ५७ वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावे लागल्याची घटना नाना पेठेत शुक्रवारी पहाटे घडली.

पुणे : एकीकडे कोरोनामुळे जनमानसात भीतीचे वातावरण असतानाच दुसरीकडे मात्र प्रशासकीय असंवेदनशीलतेचे दर्शन घडत आहे. केवळ १०८ रुग्णवाहिका चालकांनी येण्यास नकार दिल्याने तीन तास वेदनेने तळमळत असलेल्या ५७ वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावे लागल्याची घटना नाना पेठेत शुक्रवारी पहाटे घडली. शेवटी त्यांचा मृतदेह भाजीच्या टेम्पोमधून ससूनपर्यंत वाहून नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली. या घटनेमुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.येशूदास मोती फ्रान्सिस (वय ५७, रा. मनुशाह मस्जिदजवळ, नाना पेठ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सिस यांना पोटाचा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. शुक्रवारी मध्यरात्री बारा-साडेबाराच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना घराबाहेर आणून खुर्चीवर बसविण्यात आले. दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला. परंतु, त्यांनी येण्यास नकार दिला. त्यानंतर, पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनीही १०८ ला फोन केला. परंतु, कोणीही यायला तयार नव्हते. आजारी असलेली व्यक्ती जिवंत आहे की मृत आहे याचा चौकशीत पहाटे तीनपर्यंतचा वेळ घालवण्यात आला. या काळात वेदनेने तळमळत असलेले खुर्चीतच फ्रान्सिस निपचित पडले होते. रस्त्यावर लावलेले पत्रे कार्यकर्त्यांनी बाजूला केले. रस्त्यावरून मार्केट यार्ड येथे भाजी भरण्यास जात असलेल्या एका टेम्पो चालकाला विनंती करून फ्रान्सिस यांना हौद्यात टाकून ससून रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासणीपूर्वीच मृत घोषित केले.

 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यू