न्हावरे येथे अपघातात एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST2021-07-15T04:09:46+5:302021-07-15T04:09:46+5:30
मारुती वेताळ हे आपले बंधू संदीप वेताळ यांच्यासमवेत मोटारसायकलवरून जिल्हा सहकारी बँकेच्या न्हावरे शाखेकडे येत असताना शिरूर-चौफुला ...

न्हावरे येथे अपघातात एकाचा मृत्यू
मारुती वेताळ हे आपले बंधू संदीप वेताळ यांच्यासमवेत मोटारसायकलवरून जिल्हा सहकारी बँकेच्या न्हावरे शाखेकडे येत असताना शिरूर-चौफुला रस्त्यावर शिरूरच्या बाजूने भरधाव येणाऱ्या टेम्पोने त्यांना धडक दिली. या धडकेत मोटारसायकलच्या पाठीमागच्या सीटवर बसलेले मारुती वेताळ यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शिरूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक सोमेश्वर अशोक कांबळे याला संतप्त जमावाने मारहाण केली असून, त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताच्या घटनेतील टेम्पोचालक सोमश्वर अशोक कांबळे (वय-३०, रा. बाभूळसर, ता. शिरूर) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वेताळ हे येथील जिल्हा बॅंकेच्या न्हावरे शाखेत पहारेकरी म्हणून काम पहात होते.